- जाहिरात -spot_img
breaking news

गोमांस विक्रीप्रकरणी चार जणांना अटक, मुद्देमाल जप्त, कुठे घडला प्रकार पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहरातील झेंडीगेट परिसरात गोमांस विक्री केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी चार जणांना अटक केली असून सुमारे १ लाख ७० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २० मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, झेंडीगेट येथील बेपारी मोहल्ला, सुबेदार गल्ली येथे गोवंशीय जनावरांच्या मांसाची विक्री सुरू आहे. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.

छाप्यात घरामध्ये मोठ्या प्रमाणावर गोमांसाचे तुकडे तसेच गोवंशीय जनावरांचे मुंडके आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांची नावे शहेबाज अब्दुलमजीद कुरेशी (वय २९), शान अब्दुल मजीद कुरेशी (वय २६), कैफ अब्दुल मजीद कुरेशी (वय २२) आणि ऐनुर रफिक कुरेशी (वय ३६) अशी आहेत. सर्वजण बेपारी मोहल्ला, आंबेडकर चौक, झेंडीगेट येथील रहिवासी आहेत.

पंचांसमक्ष करण्यात आलेल्या झडतीदरम्यान सुमारे ५०० किलो गोमांस, मटण खिमा मशीन, वजन काटा आणि इतर साहित्य असा एकूण १,७०,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद बोरगे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुवमें आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

हे सुद्धा वाचा :  पालकमंत्र्यांच्या निर्णयाने शेतकर्‍यांना दिलासा; 'या' तारखेला सुटणार पाणी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ