- जाहिरात -spot_img
breaking news

सैनिक बँक घोटाळा प्रकरणातील आरोपींना पुन्हा दणका….

जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला
सुपा | नगर सह्याद्री
बहुचर्चित सैनिक बँक आर्थिक घोटाळा प्रकरणात आरोपींना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. पारनेर न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

या प्रकरणात यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी संजय बाजीराव कोरडे व अनिल मापारी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर चार्जशीट दाखल झाल्यानंतर आरोपींकडून पुन्हा जामिनासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, पारनेर न्यायालयाने आरोपी संजय कोरडे, निल मापारी आणि अप्पासाहेब थोरात यांचा जामीन अर्ज नामंजूर केला. सैनिक बँक घोटाळा प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार व ठेवीदारांच्या रकमेचा अपहार झाल्याचे आरोप आहेत. न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य, प्रकरणाचे स्वरूप तसेच उपलब्ध पुरावे विचारात घेऊन आरोपींना जामीन मंजूर करण्यास नकार दिल्याची माहिती मिळाली आहे.

सदर प्रकरणात सरकारी वकील ॲड.अशोक घुगे व बँकेच्या वतीने अँड. हिलाल व कुलाल असोसिएट्स यांनी जामीन अर्जास कडाडून विरोध करत प्रभावी युक्तिवाद केला. आरोपींना जामीन दिल्यास न्यायप्रक्रिया व तपासावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच ठेवीदारांच्या हितास बाधा पोहोचू शकते, असा मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सैनिक बँक घोटाळा प्रकरणातील आरोपींना सलग दुसरा मोठा धक्का बसला असून, ठेवीदार व नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे. प्रकरणातील पुढील न्यायालयीन घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा :  बारावी परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ९०.३२ टक्के, कोणत्या तालुक्यात किती पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ