- जाहिरात -spot_img
breaking news

खडकवाडीजवळ भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू, एक जखमी

पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील खडकवाडी शिवारात टाकळी ढोकेश्वर-खडकवाडी मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 7) दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. बुधा पोपट केदार (वय 27, रा. जांभुळवाडी, खडकवाडी) असे मृताचे नाव आहे.

बुधा पोपट केदार आणि आयुष मनोज चिकणे हे दोघे दुचाकीवरून टाकळी ढोकेश्वरकडून खडकवाडीच्या दिशेने जात होते. समोरून येणाऱ्या टाटा टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेनंतर दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. जखमी आयुष चिकणे याला तातडीने खासगी रुग्णवाहिकेतून अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधा केदार याला टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

याप्रकरणी मृत बुधा केदार यांचे भाऊ यांनी टाकळी ढोकेश्वर पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे. टेम्पोचालक रविंद्र बाळासाहेब टेकवडे (रा. तरडोबाची वाडी, शिरूर, जि. पुणे) याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अपघातानंतर जखमींना मदत न करता चालक निघून गेल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :  ‘ग्रीन सिटी’सारख्या उपक्रमातून व्यापक पर्यावरण चळवळ उभी करा - डॉ. विखे पाटील
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ