- जाहिरात -spot_img
breaking news

कंपनीचा पत्ता चुकल्याचे कारण देत अनुदान अडविले….ऐकावं ते नवलंच

शेततलावांचे अनुदान रखडल्याने शेतकरी आंदोलनाच्या तयारीत 

पाथर्डी | नगर सह्याद्री
प्रधानमंत्री सिंचन योजनेत सहभाग घेऊन शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने शेततलाव करून घेतले. शेततलावात ताडपत्री टाकण्यासाठी दिलेल्या कंपनीचा पत्ता चुकल्याचे कारण देऊन सातवड येथील शेतकऱ्यांचे शेत तलावाचे अनुदान अडविले. कर्जबाजारी झालेल्या लाभाथ शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
मागील तीन वर्षापूर्वी सुरू झालेल्या प्रधानमंत्री सिंचन योजनेत करंजी, घाटशिरस, सातवड व दगडवाडी या चार गावांची निवड करण्यात आली होती. या योजनेत या गावांची पाण्याची पातळी वाढविण्यासाठी बंधारे, गाळ काढणे आदी योजनांचा तसेच शेतकऱ्यांसाठी शेततलावाच्या योजनांचा समावेश होता.

पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील कानिफ पाठक, अमोल वाघ, सुरेखा वडघुले, व संजय पाठक या शेतकऱ्यांनी शेततलाव योजनेत सहभाग घेतला होता. मार्च अखेर या शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने मुदतीत काम पूर्ण केले. शेततलावात टाकण्यासाठी कृषी विभागाने दिलेल्या अधिकृत टेक्सल कंपनीकडून ताडपत्री घेऊन ती शेततलावात टाकण्यातही आली. या योजनेत शेतकऱ्यांनी अगोदर पैसे गुंतवून मग फाईल करून शासनाकडे सादर करायची असते. त्याप्रमाणे या शेतकऱ्याने शेततलाव पूर्ण केला. कृषी विभागाची टेक्सल ही अधिकृत कंपनी आहे. या फाईलमध्ये टेक्सल कंपनीचा पत्ता चुकल्याचे कारण सांगून या शेतकऱ्यांचे अनुदान रखडून ठेवले आहे. अगोदर कर्जबाजारी असलेल्या या शेतकऱ्यांवर आणखी कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. या शेतकऱ्यांचे अनुदान आठ दिवसात जमा न झाल्यास हे शेतकरी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

कंपनी व कृषी विभागाच्या
कचाट्यात सापडला शेतकरी
प्रधानमंत्री सिंचन योजनेत सातवड गावाचा समावेश झाल्याने येथील चार शेतकऱ्यांना शेततलाव मंजूर झाले. या शेतकऱ्यांनी मुदतीत हे शेततलाव पूर्ण करूनही या शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. टेक्सल कंपनी व कृषी विभागाच्या कचाट्यातून या शेतकऱ्यांची सुटका करावी.
– राजेंद्र पाठक, सरपंच, सातवड

हे सुद्धा वाचा :  अवैध माती उत्खननावर महसूलची धडक कारवाई....श्रीगोंदा तालुक्यातील प्रकार
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ