- जाहिरात -spot_img
breaking news

शिर्डीत साईबाबा मंदिर गेटसमोर महिलेची हत्या; काय घडलं पहा…

चाकूने सपासप वार | दोन महिला आरोपींना अटक
शिर्डी | नगर सह्याद्री
शिर्डी साईबाबा मंदिराच्या गेटसमोर भयंकर हत्याकांडाची घटना घडली. साईबाबा मंदिर परिसरात स्टिकर आणि फळे विकणाऱ्या महिलांच्या एका गटाने दुसऱ्या एका फळ विक्रेत्या महिलेवर चाकूने वार करत तिची हत्या केली. रविवारी रात्री ही हत्येची घटना घडली. साई मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक 4 समोर भर गदत महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्‌‍यात गंभीर जखमी झालेल्या जयश्री साईनाथ क्षीरसागर (30 वर्षे) या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी 2 फळ विक्रेत्या महिलांना शिड पोलिसांनी अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, साई मंदिर परिसरात वर्दळीच्या ठिकाणी चार ते पाच महिलांनीच दुसऱ्या महिलेवर धारदार चाकूने वार करून हत्या केली. या घटनेमुळे मंदिर परिसरात गोंधळाचे वातावरण होते. फळे विकण्यासाठी उभं राहण्याच्या किरकोळ कारणाहून झालेला वाद थेट चाकू हल्ल्‌‍यापर्यंत पोहचल्याची प्राथमिक माहिती आहे. भररस्त्यात आरोपी महिलांनी जयश्री यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्‌‍यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी शिड पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजली खांडीझोड (22 वर्षे) आणि फिजा पटेल (21 वर्षे) या दोन महिला आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिडत आता तरुणांच्या टोळक्यांसह महिलांचा गुंडराज सुरू झालाय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या हल्ल्‌‍यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र गुंड प्रवृत्तीच्या काही महिला हातविक्रेत्यांमुळे साई भक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला असल्याची चर्चा होत आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करत दोन महिलांना ताब्यात घेतले. पोलिस सध्या तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  श्री क्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथांचा यात्रोत्सव
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ