- जाहिरात -spot_img
breaking news

… तर घरगुती गॅस सिलेंडर मिळणार नाही; महिन्याला एकाच सिलेंडर, पहा सविस्तर

दोन सिलेंडरमधील अंतर तीस दिवस
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा तालुयातील घरगुती गॅस वापरणार्‍या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केवायसी पूर्ण न केलेल्या ग्राहकांना घरगुती गॅस सिलिंडर मिळणार नाही, असा निर्णय गॅस कंपन्या आणि वितरकांच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी अनेक ठिकाणी सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.

श्रीगोंदा तालुयातील साईनाथ गॅस एजन्सीकडून मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवायसी पूर्ण नसल्यास ऑनलाइन बुकिंगदेखील स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे अनेक ग्राहकांना सध्या बुकिंग करताना अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.

याशिवाय गॅस वितरणसंदर्भात आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी घरगुती गॅसच्या दोन सिलिंडरमधील किमान अंतर २१ दिवस होते. मात्र आता ही मर्यादा वाढवून ३० दिवस करण्यात आली आहे. म्हणजेच ग्राहकांना नवीन सिलिंडर बुक करण्यासाठी आधीच्या सिलिंडरनंतर किमान ३० दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या बदलामुळे प्रत्यक्षात ग्राहकांना आठ दिवस जास्त प्रतीक्षा करावी लागणार असून, त्याचा परिणाम गॅस उपलब्धतेवर होण्याची शयता व्यक्त केली जात आहे. गॅस कंपन्या आणि वितरक यांच्यात नुकतीच ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत केवायसी प्रलंबित असलेल्या मोठ्या संख्येतील ग्राहकांमुळे वितरण व्यवस्थेवर ताण येत असल्याचे सांगण्यात आले.

अनेक ग्राहकांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने वितरकांकडे गॅसचा साठा आणि पुरवठा व्यवस्थापनावर परिणाम होत असल्याची माहिती देण्यात आली. भारतातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या जसे की इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या वितरण साखळीवरही या प्रक्रियेचा परिणाम होत असल्याचे वितरकांचे म्हणणे आहे.

युद्धजन्य परिस्थितीचा इंधन पुरवठ्यावर परिणाम
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावरही दबाव वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यातील अनिश्चितता, वाहतूक खर्च आणि साठा व्यवस्थापन या कारणांमुळे एलपीजीसह इतर इंधनांच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शयता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम घरगुती गॅससह व्यावसायिक गॅस सिलिंडरवरही होऊ शकतो, असे वितरकांचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा :   मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सुरू ; देवीला हळद लावण्यासाठी मळगंगा मंदीरात शेकडो महिलांची गर्दी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ