- जाहिरात -spot_img
breaking news

अहिल्यानगर जिल्ह्यात मुलींनी नोंदवला इतिहास, श्रीगोंदा टॉपला, तालुकानिहाय निकाल पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत अर्थात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ९२.६९ टक्के लागला आहे. पुणे जिल्ह्याचा ९६.४६ तर सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९१.३१ टक्के लागला आहे.

गेल्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून ६८ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रवेश अर्ज भरला होता. प्रत्यक्षात ६७ हजार ९७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ६३ हजार ००४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९१.३१ आहे. या परीक्षेसाठी ३७ हजार ८९० मुलांनी परीक्षा प्रवेश अर्ज भरला. त्यातील ३७ हजार ६१२ मुलांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील ३४ हजार ००३ मुले उत्तीर्ण झाली. तर ३० हजार ५८७ मुलींनी परीक्षा प्रवेश अर्ज भरला. प्रत्यक्ष ३० हजार ३५८ मुलींनी परीक्षा दिली. त्यातील २९ हजार ००१ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९०.४० तर मुलींची ९५.५३ आहे. परीक्षेत गैरप्रकार करणारे १७ विद्यार्थी अहिल्यानगर जिल्ह्यात आढळून आले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या निकालात एक टक्क्याने वाढ झाली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुकानिहाय निकाल
अकोले ९५.८२, जामखेड ९३.९४, कर्जत ९३.३५, कोपरगाव ९२.७०, नगर शहर ९३.०८, नेवासा ८९.८९, पारनेर ९५.४४, पाथर्डी ९२.२०, राहाता ९१.८८, राहुरी ९२.४९, संगमनेर ९५.१९, शेवगाव ८५.७४, श्रीगोंदा ९६.१३, श्रीरामपूर ८९.५८ टक्के निकाल लागला. जिल्ह्याचा एकूण ९२.६९ टक्के निकाल लागला. अहिल्यानगर जिल्ह्यातून ६८ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ६७ हजार ९७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून ६३ हजार ००४ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले.

हे सुद्धा वाचा :  पारनेरमध्ये खते, औषधांत शेतकऱ्यांची लूट
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ