- जाहिरात -spot_img
breaking news

खुनाच्या गुन्ह्यात आरोपींना सहकार्य… एपीआय गितेंना सहआरोपी करा

निलेश बांगरे यांचे एसपींना निवेदन
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

खुनाचा गुन्हा कट रचून दडपून गुन्ह्यातील आरोपींना सहकार्य केले म्हणून नगर तालुका पोलिस ठाण्याचे तत्कालीन एपीआय प्रल्हाद गिते यांना सेवेतून कायस्वरुपी बडतर्फ करण्यात यावे. तसेच गुन्ह्यामध्ये सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस निलेश बांगेरे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

६ मार्च २०२५ रोजी मयत मिठु कार्तीक दत्त याचे व्हीआरडीई गेटजवळील कोमल फरसानचे मालक भाऊसाहेब विश्वनाथ नांगरे याचे सोबत शाब्दीक वाद झाले होते. यातून भाऊसाहेब नांगरे याने मिठु कार्तीक दत्त जबर मारहाण केली होती. गंभीर मारहाणीमुळे मिठु दत्त याला पॅसिफीक सुपरस्पेशालीस्ट हॉस्पीटल येेथे उपचारासाठी दाखल केले होते. एमएलसीवरुन पोलीस हॉस्पिटलमध्ये जबाब घेण्यासाठी गेले. परंतु, आरोपी व गिते यांच्यात गुन्हा न दाखल कण्यासाटी मोठा आर्थिक व्यवहार झाला. त्यामुळे पोलीस माघारी आले.

मिठु दत्त यास उपचारासाठी ससून येथे दाखल केले असता २३ मार्च रोजी त्यास मयत घोषित केले. दरम्यान मिठू दत्त याच्या मृत्यूची आकस्मात नोंद केली. याप्रकरणाची चौकशी होवून मिठु दत्त याच्या खुनाबाबत पाच आरापींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एपीआय गिते यांनी खुनाचा गुन्हा दडपला आहे. गिते यांची दुसरीकडे बदली केली आहे. एपीआय गिते यास तात्काळ शासन सेवेतून बडतर्फ करुन गुन्ह्यात सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी निलेश बांगरे यांनी निवेदनात केली आहे.

 

हे सुद्धा वाचा :  भाजप योग्य व्यक्तिला योग्य संधी देणारा पक्ष, काय म्हणाले पालकमंत्री विखे पाटील, सभापती राम शिंदे...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ