अहिल्यानगर | नगर सह्याद्री
मुंबईमध्ये आंदोलन करणाऱ्या जेन-झीच्या काही मुलांना ताब्यात घेऊन पोलिसांनी ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणात संबंधित पोलिसावर निलंबनाची कारवाई सरकारने केली आहे. नुसते निलंबन चालणार नाही. त्याच्यावर तात्काळ बडतर्फीची कारवाई करा, अशी मागणी अहिल्यानगर ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केले आहे.
पोलिसांचा ड्रग्जशी काही संबंध समोर आला तर त्यांच्यावर थेट बडतर्फी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात भाषण करताना महाराष्ट्राला दिले होते. त्याची आठवण काळे यांनी करुन दिली आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर संतप्त होत ठाकरे शिवसेना आक्रमक झाली आहे. किरण काळे म्हणाले, मुंबईतील सायन पोलीस ठाण्यातील कर्मचारी पवन सांगळे याने जेन-झी आंदोलनकर्त्यांना ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ अत्यंत धक्कादायक असून, ही महाराष्ट्राच्या गृह खात्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. अशा गंभीर प्रकरणात केवळ निलंबन नव्हे, तर तात्काळ बडतर्फीची कारवाई झाली पाहिजे.
दिल्लीतील विद्याथ आंदोलनात पोलिसांवर दबाव टाकून लाठीचार्ज घडवून आणला जात असल्याचा आरोप करत, आंदोलन करणाऱ्या विद्याथ-विद्यार्थिनीं समवेत झालेल्या गैरवर्तनाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही काळेंनी केली आहे. मुंबईतील तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अहिल्यानगर सह महाराष्ट्रातील आंदोलनकर्त्यांसाठी ठाकरे शिवसेनेने कायदेशीर मदतीसाठी हेल्पलाईन सुरू केली असून, खोटे गुन्हे दाखल झालेल्या विद्याथ व आंदोलकांना कायदेशीर आणि आवश्यक ती मदत दिली जाईल. यासाठी ीहळीशपरलींश्रशसरश्रसारळश्र.लेा या ईमेल आयडीवर संपर्क करायचे आवाहन काळे यांनी केले आहे.










