- जाहिरात -spot_img
breaking news

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप! तटकरे-पटेल २२ आमदार घेऊन भाजपच्या दारात, रोहित पवार काय म्हणाले पहा

मुंबई | नगर सह्याद्री –
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे पदे वगळल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू झाली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाबाबत मोठा दावा केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे २२ आमदार घेऊन २०२९ साली भारतीय जनता पक्षातून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचा सनसनाटी दावा केला आहे. तसेच एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे देखील काही आमदार भाजपच्या गळाला लागले आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर सुनील तटकरे यांनी शरद पवारांची घेतलेल्या भेटीबाबत बोलतांना रोहित पवारांनी ‘त्यांना कदाचित सिल्व्हर ओकचा चहा आवडत असेल’, असे म्हणत टोला लगावला.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह २२ आमदारांचे ऑलरेडी ठरलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याही काही आमदारांचे ठरले आहे. ज्या गोष्टी ठरल्या आहेत, त्याबद्दल मोघम बोलून चालत नाही. जे आहे ते आहे. भाजपमधून ते लढणार आहेत. फक्त प्रक्रिया फास्ट झाली. २०२९ च्या निवडणुकांपूर्वी होणं अपेक्षित होतं. कारण आताच प्रवेश झाला, तर पुन्हा निवडणूक लागेल. भाजपसोबत जे आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही जाणार नाही, पण भाजपची साथ सोडून कोणी आमच्याकडे आलं, तर त्यांना स्वीकारु, असं रोहित पवार यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा :  भारताला मोठा दिलासा! मुंबईत पोहचलं कच्च्या तेलाचे पहिले जहाज; पहा काय घडलं
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ