- जाहिरात -spot_img
breaking news

पारनेर तालुक्यात पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर….

सामाजिक कार्यकर्त्या सुनीताताई सोबले यांचे आ.काशीनाथ दाते यांना निवेदन

निघोज | नगर सह्याद्रीपारनेर शहर व तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, सर्वसामान्य नागरिक व पशुधन पाण्यासाठी आणि चाऱ्यासाठी होरपळून निघत आहे. या पार्श्वभूमीवर, तालुक्यात तात्काळ शासकीय टँकर सुरू करावेत, अवैध पाणी उपसा थांबवावा आणि पठार भागावर जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्त्या सुनीताताई सोबले यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पारनेरचे आमदार काशीनाथ दाते आणि तहसीलदार गायत्री सौंदणे यांना सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर केले.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात सुनीताताई सोबले यांनी तालुक्यातील सोबलेवाडी, कुंभारवाडी, विरोली, करंडी या गावांसह पारनेर शहर व परिसरातील भीषण सद्यस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. चालू उन्हाळ्यात या संपूर्ण भागात पाण्याचे स्रोत पूर्णपणे आटले असून, पाण्यासाठी नागरिकांना मोठी भटकंती करावी लागत आहे. ज्या गावांमध्ये आणि वाड्यावस्त्यांवर पाण्याचे सर्व स्रोत आटले आहेत, तिथे कोणतीही दिरंगाई न करता तातडीने शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तालुक्यातील ज्या तलावांमध्ये सध्या थोडेफार पाणी शिल्लक आहे, त्याचे योग्य नियोजन करून ते पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात यावे, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.याशिवाय, प्रशासनाने अवैध उपसा तात्काळ रोखून ते पाणी पिण्यासाठी सुरक्षित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तालुक्यात चाऱ्याचा प्रश्नही अत्यंत उग्र बनला असून जनावरांना जगवणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे गरज असलेल्या गावांमध्ये तातडीने चारा उपलब्ध करून द्यावा आणि पारनेर तालुक्याच्या पठार भागावर शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी तात्काळ ‌’चारा छावण्या‌’ सुरू कराव्यात, या प्रमुख मागण्या सोबले यांनी लावून धरल्या आहेत.

पारनेर तालुक्यात पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. सर्वसामान्य नागरिक आणि पशुधन या भीषण टंचाईत होरपळून निघत असताना प्रशासन मूग गिळून गप्प बसू शकत नाही. जर तात्काळ शासकीय टँकर आणि चारा छावण्या सुरू करून जनतेला दिलासा दिला नाही, तर नागरिकांच्या हक्कांसाठी आम्हाला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडावे लागेल.
– सुनीताताई सोबले, पारनेर

हे सुद्धा वाचा :  विधान परिषद निवडणूक; ४६१ मतदार बजावणार मतदानाचा हक्क : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ