रुपयाची घसरण थांबता थांबेना…
मुंबई/नगर सह्याद्री
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय रुपयात शुक्रवारी (15 मे) ऐतिहासिक घसरण झाली. अशा परिस्थितीत, रुपया आणखी कमजोर होऊन डॉलरच्या तुलनेत 100 च्या महत्त्वाच्या टप्प्याकडे सरकला, तर त्याचा भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारांवर परिणाम होणार आहे.
भारताच्या रुपया चेन्च्युरी करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. क्रूडच्या वाढत्या किंमती, डॉलरची मजबुती आणि पश्चिम आशियातील तणाव अजूनही कायम अशा घटकांच्या दबावामुळे, भारतीय रुपयाने शुक्रवारी इतिहासात पहिल्यांदाच 96 चा टप्पा ओलांडला. शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, दिवसभरात 50 पैशांनी घसरून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने 96.14 या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळी गाठली.
गेल्या सलग तीन सत्रात रुपया कमकुवत झाला असून या आठवड्यात आतापर्यंत सुमारे 1.36% घसरण झाली. परिणामी, रुपयाने पुन्हा एकदा विक्रमी नीचांकी पातळी गाठली. जागतिक बाजारात तेलाच्या किमतींमधील तीव्र वाढीमुळे गेल्या काही महिन्यांत रुपयावरील दबाव अधिकच वाढला. ब्रेंट क्रूडच्या एका बॅरलचा भाव 107 डॉलरजवळच उच्चांकीवर राहिल. जागतिक ऊर्जा पुरवठ्याबाबत चिंता आणि भू-राजकीय तणाव यामुळेच भारतीय चालनावरील दबाव सतत वाढत आहे. आपल्या कच्च्या तेलाच्या एकूण गरजेपैकी जवळपास 90% तेल आयात करणाऱ्या भारतासाठी तेलाच्या वाढत्या किमती आणि बळकट होत असलेला डॉलर घटक अत्यंत संवेदनशील आणि चिंतेचे विषय आहे.










