- जाहिरात -spot_img
breaking news

संत शेख महंमद महाराज देवस्थानची वक्फ नोंदणी रद्द करण्याचे आदेश

धर्मादाय आयुक्तांचे आदेश
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्री संत शेख महंमद महाराज देवस्थानाची वक्फ बोर्डाकडे करण्यात आलेली नोंदणी दोन महिन्यांच्या आत रद्द करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिल्याची माहिती श्रीगोंदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

संत शेख महंमद महाराज यात्रा समिती आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने ही पत्रकार परिषद घेण्यात आली. घनश्याम अण्णा शेलार यांनी सांगितले की, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमाच्या कलम 41-अ अंतर्गत धर्मादाय आयुक्तांना या प्रकरणात आदेश देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार चौकशी अर्ज क्रमांक 768/2025 अंशतः मंजूर करण्यात आला असून, वक्फ बोर्डाकडील नोंदणी रद्द करण्यासाठी दोन महिन्यांत अर्ज सादर करण्याचे निर्देश संबंधित ट्रस्टच्या विश्वस्तांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, न्यासाच्या नावासंदर्भातील प्रकरण वरिष्ठ न्यायालयात प्रलंबित असल्याने त्यासंबंधीची मागणी तात्पुरती अमान्य करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.पत्रकार परिषदेत घनश्याम शेलार यांनी संत शेख महंमद महाराज यांच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले की, महाराजांवर अनेक तत्त्ववेत्त्यांनी विचार व्यक्त केले आहेत. मात्र, काहींकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही न्यायालयात सर्व आवश्यक पुरावे सादर केले आहेत. 2008 साली हा विषय वक्फ बोर्डाकडे गेला होता, मात्र समोरील बाजूकडून कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आला नाही, असे ते म्हणाले.मठाधिपती हा हिंदू धर्मपद्धतीतील शब्दप्रयोग असून महाराष्ट्र शासनानेही देवस्थान हाच शब्द वापरल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच संत शेख महंमद महाराजांनी भागवत आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार केला असून, त्यांच्या मूळ इतिहासाचा स्वीकार झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

या पत्रकार परिषदेला गोपाळ मोटे पाटील, पोपट खेतमाळीस, चंद्रकाका कटारिया, झुंजरूक तात्या, विवेक पालकर, शेख महंमद महाराज यांचे वंशज शेख, सतीश मखरे, नगरसेवक अनिल महाराज ओटी, दादा औटी, अजिम जकाते, बाळासाहेब दुतारे, संजय आनंदकर, अशोक आळेकर, सुधीर खेडकर, आगाऊ भाऊसाहेब, कांतीलाल खेतमाळीस यांच्यासह यात्रा कमिटी सदस्य व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  कुकडीतून विसापूर धरणात पाणी सोडण्याचा निर्णय
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ