- जाहिरात -spot_img
breaking news

महिलेने महिलेचा केला निर्घृण खून, मेल्यानंतरही चाकूने वार; कुठे घडली घटना पहा

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री –
छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर खून प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असताना, आता या प्रकरणातील एक अत्यंत भयानक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. एका महिलेने दुसऱ्या महिलेचा निर्घृण खून केला. आरोपी महिला इतक्यावरच थांबली नाही मृतदेहावर चाकूने सपासप वार केले. हा भयंकर व्हिडिओ समोर आला आहे.

संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील बजाजनगर येथे २२ एप्रिल रोजी घडलेल्या या थरारक घटनेत, आरोपी शैला सोनार हिने साधना सोनपेठकर यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला होता. तिच्याकडे चाकू, पिस्तूल, स्प्रे आणि कुलूप यांसारखे साहित्य असल्याचे तपासात समोर आले आहे. घरात घुसल्यानंतर दोघींमध्ये वाद झाला आणि त्यानंतर आरोपीने पिस्तूल रोखून साधना सोनपेठकर यांच्यावर चाकूने सपासप वार केले.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आरोपी महिला अत्यंत निर्दयीपणे पोट, छाती आणि गळ्यावर वार करताना दिसत आहे. या घटनेची भीषणता पाहून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दरवाजा तोडून आरोपीला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले. या प्रकरणी न्यायालयाने आरोपी शैला सोनार हिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी महिला सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरत असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणीही वाढत आहे.

हे सुद्धा वाचा :  राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर ; 23 एप्रिलला मतदानतर 4 मे ला मतमोजणी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ