- जाहिरात -spot_img
breaking news

कांदा दरासाठी शिवसेनेचा एल्गार; तहसीलवर धडक मोर्चा, केली ही मागणी

सरकारच्या धोरणामुळे कांदा उत्पादक देशोधडीला ः डॉ. श्रीकांत पठारे
पारनेर | नगर सह्याद्री

कांद्याच्या दरात झालेली मोठी घसरण आणि उत्पादन खर्चही निघत नसल्याने मेटाकुटीला आलेल्या शेतकर्‍यांच्या प्रश्नांवरून पारनेर तालुयात शिवसेनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकर्‍यांच्या व्यथा मांडत प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मोर्चाला संबोधित करताना डॉ. श्रीकांत पठारे म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकरी सरकारच्या चुकीच्या निर्यात धोरणामुळे देशधडीला लागला आहे. एक किलो कांदा पिकवण्यासाठी साधारणपणे १३ रुपये खर्च येतो, मात्र बाजारपेठेत ७ ते ८ रुपये भाव मिळत आहे. याचा अर्थ प्रत्येक किलोमागे शेतकर्‍याला ५ ते ६ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे.

यावेळी शिवसेना पदाधिकार्‍यांनी आक्रमक भाषणे करत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला. जर येत्या काही दिवसांत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी बाजार समितीचे उपसभापती किसनराव सुपेकर, जिल्हा समन्वयक सखाराम उजगरे, पारनेर नगर विधानसभाप्रमुख संतोष येवले, उपजिल्हाप्रमुख डॉ.भास्करराव शिरोळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रशांत निंबाळकर, बाजार समितीचे संचालक बाबासाहेब नर्‍हे, गुलाबराव नवले, किसनराव चौधरी, नितीन आहेर, मंगेश सालके, आदिनाथ कदम, उपसरपंच विवेक मोरे, बाबासाहेब रेपाळे, संतोष साबळे, डॉ.राजेश येवले, धनंजय पांढरे, सूर्यकांत सालके, हरिओम परंडवाल, सुभाषराव भोसले, संपत चत्तर, राजेंद्र लालगे, ओंकार एरंडे, अंबादास कणसे, दत्तात्रय शिंदे, संतोष लामखडे, दादाभाऊ जाधव, अतुल मुळे, सोपान लंके, दत्ता पानसरे, संपत खोडदे, प्रविण आवारी, राजेश पावडे, राजेंद्र नवले, प्रवीण व्यवहारे, भरत ठुबे, अतुल पांढरे, ओंकार थोरात, ओंकार पांढरे, रोहन थोरात, राजू बोरुडे, संकेत शेळके, शिवतेज शेळके, नितेश धोत्रे, संतोष कापसे, सुनील आरोटे, दिपक मगर, आदित्य महांडुळे, सोहम महांडुळे, राहुल खोडदे, राहुल मोरे, शुभम पठारे, पप्पू गाडगे, सुरेश बुचुडे, बंडू मोरे, लहू बुचुडे, दिपक मावळे, खोसे टेलर, पोपट वायकर, रोहन कदम, भास्कर नाईकवाडी, भाऊसाहेब गोरे, भावराव नाईकवाडी, विनायक बरशिले, अनिल पुंडे, भगवान डेरे, संदिप गोसावी, सुनील येवले व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

हे सुद्धा वाचा :  शहर विधानसभा मतदार यातीदील बोगस नावे वगळा

आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांच्या मागण्या
कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या आहेत. कांद्याला प्रति किलो १० रुपये अनुदान आणि कायमस्वरूपी हमीभाव मिळावा, अशी प्रमुख मागणी आहे. तसेच, वारंवार होणारी निर्यात बंदी थांबवून स्थिर धोरण राबवावे, शासकीय गोदामांची निर्मिती करावी आणि कांदा प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून शेतकर्‍यांना शाश्वत आधार मिळेल.

कांदादराच्या प्रश्नी प्रशासनाला इशारा
शेतकर्‍यांचा संयम आता सुटत चालला आहे. बाजारभावात सुधारणा न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा गर्भित इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे पारनेर तालुयात कांदा दराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता सरकार काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ