- जाहिरात -spot_img
breaking news

संतोष मुटकुळे एलसीबीचे कारभारी; पाच पोलीस निरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या… 

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
मागील आठवड्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सोमवारी पुन्हा पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या बदलीनंतर सहायक पोलीस निरीक्षक हरीष भोये यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेचा तात्पुरता पदभार देण्यात आला होता. नव्याने जिल्ह्यात रूजू झालेले पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांची श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांची अकोले पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अकोले पोलीस ठाण्याचे प्रभारी मोहन बोरसे यांची शेवगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. नव्याने जिल्ह्यात दाखल झालेले पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे यांना कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :  पोलीस दलात कारभारी बदलले, एलसीबी, कोतवाली तोफखान्यासह अनेकांची बदली
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ