- जाहिरात -spot_img
breaking news

कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणीसाठ्यात घट.. कशामुळे झाली

उष्णतेमुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले,

उन्हाळी हंगामात कपात; आवर्तन पिण्यासाठी की शेतीसाठी?

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
कुकडी प्रकल्पातील धरणांमधील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असून, वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील आवर्तनामध्ये कपात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, पुढील आवर्तन पिण्यासाठी सोडले जाणार की शेतीसाठी, याबाबतचा निर्णय अद्यापही प्रलंबित असल्याने कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

15 मेच्या आकडेवारीनुसार धरणांतील उपलब्ध पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे : येडगाव 56.89 टक्के, माणिकडोह 6.42 टक्के, वडज 38.48 टक्के, पिंपळगाव जोगे 17.33 टक्के, डिंभे 18.30 टक्के, विसापूर 14.69 टक्के, चिल्हेवाडी 71.26 टक्के तर घोड धरणात केवळ 4.65 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
दरम्यान, 14 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता मीना पूरक कालव्याचा विसर्ग कमी करून 60 क्युसेस
करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

यंदाचा उन्हाळा अत्यंत तीव्र स्वरूपाचा असल्याने धरणांमधील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, करमाळा आदी तालुक्यांना अद्याप उन्हाळी हंगामाचे दुसरे आवर्तन मिळालेले नाही. कुकडी पाटबंधारे विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 28 मे रोजी उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन सोडले जाण्याची शक्यता आहे. मात्र, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना हे आवर्तन 15 जूनपर्यंत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यामुळे पावसाचे आगमन आणि कुकडीच्या पाण्याचे आवर्तन यांचा संगम पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.
मात्र, हे आवर्तन पिण्यासाठी राखीव ठेवले जाणार की शेतीसाठी सोडले जाणार, याबाबत वरिष्ठ स्तरावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे समजते.

कुकडी लाभक्षेत्रात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, अनेक भागांत हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन वेळेत न झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
कुकडीच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी नेमके गेले कुठे? असा सवालही शेतकरी उपस्थित करत आहेत. आता या आवर्तनाबाबत पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि कालवा सल्लागार समिती कोणता निर्णय घेते, याकडे कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा :  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनावले ...कोणाला दिली समज
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ