- जाहिरात -spot_img
breaking news

रिक्षा चालकावर चाकूने हल्ला; नाजूक व्यवसायाला विरोध नेल्याने राडा, वाद सोडवताना तरुणावर हल्ला

अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
येथील पिंपळगाव माळवी रस्त्यावर प्रवाशांची ने-आण करणार्‍या एका रिक्षा चालकावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगावगुप्ता ते डेंटल कॉलेज दरम्यान रिक्षा चालवण्यावरून वाद झाल्याने ही मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ८ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास दीपक शंकर बोरसे हे आपली रिक्षा घेऊन जात होते. यावेळी आरोपी अमित विजय शिंदे आणि सुमित अशोक शिंदे यांनी त्यांना अडवले. ’आमच्या मार्गावर रिक्षा चालवायची नाही’ अशी दमदाटी करत दोन्ही आरोपींनी दीपक यांना शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर अमित शिंदे याने त्याच्याकडील धारदार चाकूने दीपक यांच्या डाव्या हातावर आणि खांद्यावर वार करून त्यांना जखमी केले.या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी दीपक बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

वेश्या व्यवसायाला विरोध केल्याने तरुणांना मारहाण
अहिल्यानगर – नगर तालुक्यातील रुईछत्तीसी परिसरात वेश्या व्यवसायाला विरोध केल्याच्या कारणावरून तरुणांना अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच, त्यांच्या खिशातील २० हजार रुपये बळजबरीने काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सागर नागदेव जगदाळे हे आपल्या साथीदारांसह जात असताना आरोपींनी त्यांची गाडी अडवून त्यांना खाली ओढले. गणेश देवराम छत्तीसे, प्रशांत देवराम छत्तीसे, निर्मला देवराम छत्तीसे, शोभा दिलीप गोरे, अभिजीत दिलीप गोरे, दिलीप दत्तात्रय गोरे, जुबेर नसीर शेख आणि गणेश उर्फ भैय्या संपत गोरे (सर्व रा. रुईछत्तीसी) यांनी संगनमताने हे कृत्य केले. यावेळी आरोपींनी फिर्यादीला व त्यांच्या सोबत्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. प्रशांत छत्तीसे याने हातातील दांडयाने मारहाण करत फिर्यादीचे पैसे लुटले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नगर तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  नवीन एमआयडीसीत मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न; आमदार संग्राम जगताप काय म्हणाले पहा

वाद सोडवताना तरुणावर जीवघेणा हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर – अहिल्यानगर येथील भिंगार भागातील यशवंत नगर परिसरात वाद सोडवताना एका तरुणावर लाकडी दांडयाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सात मार्चच्या रात्री यशवंत नगर येथे काही मुले वाद घालत होती. हे वाद मिटवण्यासाठी फिर्यादी करण मुकेश खरे यांचे वडील पुढाकार घेत होते. यावेळी आरोपी विकास मधुकर शिंदे आणि प्रेम विकास शिंदे यांनी त्यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.ही भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी विकास शिंदे याने करण खरे यांच्या डोयात लाकडी दांडका मारला. या हल्ल्यात करण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतकेच नाही तर आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी करण खरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भिंगारमध्ये तुंबळ हाणामारी
अहिल्यानगर ः येथील भिंगार परिसरात यशवंत नगर भागात मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात फिर्यादी विकास मधुकर शिंदे यांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी करण खरे, अर्जुन खेर, शक्ती बैद आणि आकाश लोट हे फिर्यादी यांच्या मुलाला मारहाण करत होते. हे भांडण सोडवण्यासाठी विकास शिंदे मध्यस्थी करण्यासाठी गेले असता, आरोपींनी त्यांनाही लक्ष्य केले. यावेळी आरोपी आकाश लोट याने लोखंडी सळईने फिर्यादीच्या डोयात प्रहार करून त्यांना जखमी केले. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. विकास शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ