- जाहिरात -spot_img

चार दिवस उलटले, अधिकारी नाही फिरकले! नेमके कारण काय ..

न्यायासाठी तहसीलसमोर उपोषण सुरूच

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशीही कायम असून, अद्याप कोणतेही संबंधित अधिकारी किंवा प्रशासनातील प्रतिनिधींनी भेट दिलेली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, दिवाणी न्यायालयाचा आदेश असतानाही संबंधित प्रकरणाची योग्य दखल घेतली जात नसून दिलेल्या प्रकरणाची चौकशीही करण्यात आलेली नाही. यामुळे न्याय मिळवण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी सांगितले.दौलत किसन पिंपळे, कुसुम दौलत पिंपळे, सोहम दौलत पिंपळे व अजय दौलत पिंपळे हे कुटुंबीय तहसील कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. उपोषणाला चार दिवस पूर्ण होऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नसल्याने उपोषणकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. माध्यमांशी संवाद साधताना उपोषणकर्त्यांनी सांगितले की, आम्ही न्यायाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करत आहोत.

चार दिवस झाले तरी आमच्या मागण्यांची दखल घेण्यासाठी एकही अधिकारी आलेला नाही. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचे उपोषण सुरूच राहील.दरम्यान, तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित प्रकरणात योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. उपोषणावर तोडगा निघतो की ते आणखी लांबते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा :  गद्दारांनी आधी राजीनामे द्यावेत, मगच...; ठाकरे सेनेने नगरमध्ये काय केले पहा
Follow us:

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Follow us on

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ

आमच्याविषयी

राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारी पत्रकारीता करीत असताना रोखठोक आणि आक्रमक पत्रकारीता ही ‘नगर सह्याद्री’ची ओळख! ‘नगर सह्याद्री’ वाचला जातो तो वेगळ्या वैचारिक लिखाणासाठी! आम्ही परखड विचारांचा ‘सारिपाट’ मांडतो त्यासाठीच! लाळघोटणारी पत्रकारीता ‘नगर सह्याद्री’च्या टीमने कधी केली नाही आणि करणार पण नाही!

अहिल्यानगर कार्यालय

कुंदन नगरी अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा अहमदनगर महाराष्ट्र ४१४००१

© 2026 Nagarsahyadri.com