- जाहिरात -spot_img
breaking news

ट्रॅव्हल जिहाद विरोधात आ. जगताप आक्रमक, महिलांनी षडयंत्र समजून घ्या, वेळीच सावध व्हा, अन्यथा…

भर उन्हात शेकडो हिंदू महिलांसह नागरिकांचे रस्ता रोको आंदोलन
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर पुणे शिवशाही बसमध्ये मुस्लीम कंडटरने एका हिंदू महिलेची छेद काढल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आ. संग्राम जगताप हे चांगलेच आक्रमक झाले. या नव्या ट्रॅव्हल जिहाद विरोधात सकल हिंदू समजाच्या वतीने सोमवारी सकाळी कायनेटिक चौकात सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रणरणत्या उन्हात तापलेल्या रस्त्यावर शेकडो हिंदू महिलांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या रस्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला. हिंदू प्रवासी महिलेची छेद काढणार्‍या मुस्लीम कंडटरवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही व आंदोलन मागे घेणार नाही, अशी आक्रमक भूनिका आ.संग्राम जगताप यांनी घेतल्यावर पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. सुमारे तासाभराने पोलिस अधिकार्‍यांनी सबंधित कंडटरवर गुन्हा दाखल केल्याची प्रत आ. संग्राम जगताप यांना दिल्यावर हे रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले, नगरमध्ये आपण लव्ह, लँड, व्होट जिहाद विरोधात आंदोलने केली. पण आता नाशिक मध्ये आयटी जिहाद व नगरमध्ये ट्रॅव्हल जिहादचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे आपल्या महिला भगिनींची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या विरोधात सर्व हिंदू महिला नागरिकांनी जागरूक होणे आवश्यक आहे. महिलांनी मुस्लीम समजाचे षडयंत्र समजून घ्या, वेळीच सावध व्हा. हा समाज सातत्याने हिंदू समजावर अत्याचार करत आहेत. आता हे सहन न करता जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे, असे आवाहन आ.जगताप यांनी केले.

ते पुढे म्हणाले, नगरमध्ये जिहादी वृतींकडून असे वेगवेगळ्या जिहादचे प्रकार वाढत आहेत. हिंदू महिलांनी आत जागरूक झाले पाहिजे. ज्या बस, रिक्षा व गाडीने महिला प्रवास करत असतील त्या गाड्यांचे ड्रायव्हर व कंडटर हे हिंदू आहेत की नाही याची खात्री करूनच त्या गाडीने प्रवास करा. या आधीही ज्या घटना घडल्या त्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. शासन त्यावर कारवाई करेलच. पश्चिम बंगाल निवडणुकीत सर्व हिंदू समाज एकवटल्याने बांगलादेशी जीहाद्यांचे काहीही चालले नाही. अशी एकजूट आता अंतर्गत मतभेद विसरून महाराष्ट्रात दाखवा. हिंदू हा ओरीजनल हापूस आंबा असून हे जिहादी बाहेरून आलेले मिस ब्रीडचे कलमी आंबे आहेत. त्यामुळे आपण या ब्रीद पासून लाभ राहावे, असे हि आवाहन त्यांनी केले.

हे सुद्धा वाचा :  शिक्षक बीएलओ कामावर, शिक्षण वाऱ्यावर ! मराठी शाळांच्या अस्तित्वावरच घाला?

यावेळी महापौर ज्योती गाडे, भाजपा शहर जिल्हध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा युतीचे सर्व नगरसेवक व नगरसेविका, महिला पदाधिकारी व विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ