- जाहिरात -spot_img
breaking news

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनावले …कोणाला दिली समज

महायुतीत फूट पडेल असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे आदेश

मुंबई/नगर सहयाद्री :
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केला होता. शिरसाट यांच्या या विधानामुळे महायुतीत खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिरसाट यांना कडक शब्दांत समज दिली. महायुतीत फूट पडेल असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटामध्ये अंतर्गत कलह असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले. याच घडामोडींवर भाष्य करताना मंत्री संजय शिरसाट यांनी खळबळजनक दावा केला होता. काही लोकं आमच्या संपर्कात असून आमच्याशी बोलतात. कोणाच्या नेतृत्वात काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडला आहे हे नाकारता येत नाही, त्यांच्या पक्षात काय घडतंय हे काही दिवसांत कळेल,” असे म्हणाले होते.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावर यावर आक्षेप घेतला. “संजय शिरसाट आमच्या पक्षावर कसे बोलू शकतात?” असा सवाल त्यांनी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे यांना विचारला., “यापूर्वी समज दिल्यानंतरही शिरसाट पुन्हा राष्ट्रवादीवर भाष्य करत आहेत. यापुढे त्यांनी असे वक्तव्य केल्यास आम्ही त्यांची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करू,” असा इशारा दिला होता. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री शिरसाट यांना फोन करून कडक शब्दांत सुनावले आहे. महायुती संदर्भात करण्यात येत असलेली वक्तव्य थांबवा. महायुतीत फूट पडेल असे काही बोलू नका. आपल्या तिन्ही मित्रपक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवायचे आहे. त्यामुळे पुन्हा अशी वक्तव्ये करू नका, अशी समज दिली आहे.

हे सुद्धा वाचा :  पोलिस सांगून ज्येष्ठाला लुटले, जुन्या वादातून जेऊरमध्ये राडा, कृपाल आश्रमात दानपेटी फोडली, पोलिसांना टीप दिली... ड्रायव्हरवर हल्ला कुठे काय घडलं पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ