- जाहिरात -spot_img
breaking news

डॉ. शिवाजी ठुबे यांना युवा शास्त्रज्ञ पुरस्कार प्रदान…. नवी दिल्लीत सोहळा

वनस्पती संरक्षण विज्ञानातील अतुलनीय योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल

पारनेर | नगर सह्याद्री
राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमीकडून वनस्पती संरक्षण विज्ञानातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. शिवाजी हौसराव ठुबे यांची प्रतिष्ठेच्या युवा शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी निवड करण्यात येऊन त्यांना गेल्या 05 जून रोजी हा पुरस्कार नवी दिल्ली येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

देशातील सर्वोत्तम युवा शास्त्रज्ञांना दरवष हा पुरस्कार प्रदान केला जातो. डॉ. ठुबे यांच्या रूपाने नागपूर कापूस संशोधन केंद्राच्या स्थापनेपासून प्रथमच एका शास्त्रज्ञाला हा बहुमान मिळाला आहे. डॉ. ठुबे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. मूळचे पारनेर तालुक्यातील बाबुड येथील शेतकरी कुटुंबातील असलेल्या डॉ. ठुबे यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत खडतर परिस्थितीतून झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुड येथे, तर माध्यमिक शिक्षण श्री ज्ञानेश्वर विद्यालय रुई छत्रपती येथे झाले. चंद्रपूर येथील आनंद निकेतन वरोरा येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कीटक शास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. कीटक शास्त्रातील एमएससी प्रवेश परीक्षेत ते भारतातून तिसरे आले. पीएचडी (कीटकशास्त्र) दिल्ली येथून पूर्ण करताना देशातून प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या संशोधन कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. पीएचडी फेलोशिप मिळाल्यानंतर त्यांनी केरळ येथील सुपारी संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून आपल्या कारकिदची सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांची नागपूर येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये बदली झाली.

कीटकशास्त्रा तील आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांनी वनस्पती संरक्षण विज्ञानात नेहमीच उल्लेखनीय संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनाचा फायदा वन संरक्षण, पीक संरक्षण आणि दुर्मिळ वनस्पती संरक्षण अशा विविध क्षेत्रांना झाला आहे. या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना हा प्रतिष्ठेचा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार जाहीर केला आहे. राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमीचे अध्यक्ष डॉ. हिमांशू पाठक यांनी पत्राद्वारे कळविल्याप्रमाणे, सदर पुरस्कार वितरण सोहळा 05 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे पार पडला. या समारंभासाठी देशातील सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ उपस्थित होते.
डॉ. ठुबे यांना यापूव 2022-23 साठी टी. एन. अनंतकृष्णन युवा शास्त्रज्ञ पुरस्कार, तसेच 2022 सालीच सीपीसीआरआय बेस्ट सायंटिफिक रिसर्च टीम अवॉड व 2025 साली सीआयसीआर गोल्डन ज्युबिली बेस्ट सिनिअर सायंटिस्ट अवॉर्ड प्रदान करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा :  अक्षय तृतीयानिमित्त श्री विशाल गणेशाला १११११ आंब्यांचा नैवेद्य
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ