- जाहिरात -spot_img
breaking news

कर्जत-जामखेड मध्ये डिजिटल शैक्षणिक क्रांती, साडे नऊ कोटींचे साहित्य…

३४३ शाळांना ९ कोटी ६४ लाख २७ हजार रुपये खर्चाचे डिजिटल साहित्य
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार हे उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आपल्या स्थानिक विकासनिधीतून कर्जत आणि जामखेड तालुक्यातील जिल्हापरिषद शाळांमध्ये डिजिटल शिक्षण सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सोमवार, दिनांक १३ एप्रिल, २०२६ रोजी सकाळी १० वाजता या अभियानाअंतर्गत १४० शाळांमध्ये ६५ इंची इंटरऍटिव्ह पॅनल, ई-लर्निंग सॉफ्टवेअर, वायरलेस कीबोर्ड व माऊस आणि ऑफलाइन यूपीएस असे शैक्षणिक साहित्य लोकार्पणाचा सोहळा आयोजित करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृष्यप्रणालीद्वारे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

एकूण ९ कोटी ६४ लाख २७ हजार रुपये इतया निधीचे डिजिटल शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कर्जत तालुयात एकूण शाळांची संख्या २६६ असून सन २०२२-२०२३ मध्ये ४१, सन २०२४-२०२५ मध्ये १०० आणि सन २०२५-२०२६ मध्ये ८४ अशा एकूण २२५ शाळा तर जामखेड तालुयात एकूण शाळांची संख्या १७३ असून तेथे सन २०२२-२०२३ मध्ये ३०, सन २०२४-२०२५ मध्ये २८ आणि सन २०२५-२०२६ मध्ये ५६ अशा एकूण ११४ शाळांमध्ये आणि अहिल्यानगरमध्ये ०४ याप्रमाणे  एकूण ३४३ शाळांमध्ये डिजिटल शैक्षणिक संच वाटप करण्यात येत आहे.

या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, अहिल्यानगर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तसेच शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थीवर्ग, पालक, शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत.

या अभियानामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण असून दृक-श्राव्य माध्यमातून अत्याधुनिक, रंजक व सुलभ शिक्षण पध्दती उपलब्ध होत आहे. शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यात वाढ होईल आणि विद्यार्थ्यांचा शैक्षिणिक सहभाग, आत्मविश्वास वाढण्यास हातभार लागेल. आधुनिक शिक्षणाच्या संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही प्राप्त होत असल्याने ग्रामीण आणि शहरी अशी दरी कमी होऊन स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त होईल. आजच्या या सोहळ्यात शैक्षणिक संच प्राप्त झालेल्या १४० शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिक सहभागी होत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडविणारा हा उपक्रम धडाडीने राबवित असलेले विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचे त्याबद्दल अभिनंदन केले जात आहे.

हे सुद्धा वाचा :  खर्ड्याची कन्या धारा बीडकर भारतीय तिरंदाजी संघात
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ