- जाहिरात -spot_img
breaking news

मुळा कारखान्याची निवडणूक सभासद शेतकऱ्यांनी हातात घेतली ; मा. खा. यशवंतराव गडाख

सोनईत भर पावसात हजारोंची उपस्थिती

सोनई/ नगर सह्याद्री
मोठ्या कष्टाने 50 वर्षांपूर्वी मुळा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. मुळा कारखान्यामुळे तालुक्याच्या अर्थकारणाला गती मिळाली. कारखाना सुस्थित असल्याने कारखाना शेअर्सची किंमत आज बाजारभावाप्रमाणे चांगली आहे. मा.मंत्री शंकरराव गडाख यांनी स्वतः लक्ष देऊन कारखान्याची क्षमता वाढवल्याने व इतर प्रकल्प उभे केल्याने मुळा कारखाना शेतकऱ्यांचा ऊस वेळेत नेऊन त्यांना हक्काचे पैसे देऊ शकतो. कारखान्याच्या माध्यमातून परिसराच्या विकासाला हातभार लावण्याचा नेहमी प्रयत्न केला. जुनी पिढी व तरुणांना सोबत घेऊन शंकरराव गडाख कारखाना समर्थपणे पाहत आहेत, याचा मनस्वी अभिमान आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी उभा केलेल्या कारखान्याची निवडणूक सभासद व शेतकऱ्यांनी हातात घेतली असून, सहकार पॅनलच्या उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करण्याची खूणगाठ मनाशी बांधल्याचा विश्वास मुळा कारखान्याचे संस्थापक मा. खा. यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केला. 

मुळा सहकारी साखर कारखान्याच्या करजगाव गट व महिला मतदार संघ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीची सहकार पॅनलची प्रचार सभा सोनई येथे मुळा कारखान्याचे संस्थापक मा. खा. यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली व मा. मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुळाचे चेअरमन नानासाहेब तुवर, ह भ प रामनाथ महाराज पवार, मुळाचे व्हा. चेअरमन कडूबाळ कर्डीले, शिरेगाव सोसायटीचे चेअरमन डॉ. रमेश प्रल्हाद जाधव, मा. सरपंच रत्नाकर बोर्डे, अश्रूबा सानप आदी उपस्थित होते.

माजी मंत्री शंकरराव गडाख म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रातील पूर्ण उसाचे गाळप व्हावे, यासाठी कारखान्याची गाळप क्षमता 9 हजार टन करत कारखान्याचा विस्तार केला. उसाला चांगला भाव देता, यासाठी कारखान्याने पैसे उपलब्ध करून महत्वकांक्षी इथेनॉल प्रकल्प सुरू केला. कार्यक्षेत्रात कितीही ऊस उपलब्ध झाला तरीही कुणाचाच ऊस 12 महिन्यापेक्षा जास्त दिवस गळीताशिवाय राहणार नाही. सर्वसामान्य शेतकरी, सभासद, ऊस उत्पादक यांना केंद्रस्थानी ठेऊन कारखान्याचा कारभार सचोटीने केलेला आहे. मिळालेल्या राजकीय पदाचा उपयोग कारखाना व सभासदांच्या हितासाठीच केला. सहकार मोडू पाहणारे फक्त स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी मुळा कारखान्याविषयी खोटेनाटे आरोप करतात, हे हास्यास्पद आहे. त्यांना सभासद बांधव मतदानातून निश्चित उत्तर देतील, असा इशारा गडाख यांनी दिला.

हे सुद्धा वाचा :  ७/१२  नसतानाही ११ शेतकर्‍यांचे लाटले अनुदान; पारनेरमध्ये काय घडलं पहा...

सूत्रसंचालन डॉ, रामनाथ बडे यांनी केले. विविध संस्थाचे पदाधिकारी, मुळाचे सर्व बिनविरोध १८ संचालक, सभासद, तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भर पावसातही मा मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार पॅनलला पाठींबा देण्यासाठी सभासद बांधव, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विरोधी उमेदवाराच्या कुटुंबियांचा सहकारला पॅनलला पाठींबा जाहीर केला,

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ