- जाहिरात -spot_img
breaking news

मुंबईत बॉम्बस्फोट होणार…! पोलिसांना खोटी माहिती देणे पडले महागात

हिवरे कोरडा (ता.पारनेर) येथील तरुणावर गुन्हा दाखल
पारनेर / नगर सह्याद्री
मुंबईत बॉम्बस्फोट होणार आणि शहराचा नाश होणार, असा खोटा कॉल करून पोलीस प्रशासनाची धावपळ उडवणाऱ्या एका तरुणाला पारनेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मयुर लक्ष्मण साळवे (वय ३०, रा. हिवरे कोरडा, ता. पारनेर) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:१६ ते १०:१७ च्या सुमारास आरोपी मयुर साळवे याने आपल्या मोबाईलवरून पोलीस हेल्पलाइन ‘डायल ११२’ वर दोन वेळा कॉल केला. या कॉलमध्ये त्याने “मुंबईचा नाश होणार आहे आणि मुंबईमध्ये ब्लास्ट (बॉम्बस्फोट) होणार आहे” अशी धक्कादायक माहिती दिली. मुंबईसारख्या संवेदनशील शहराबाबत अशा प्रकारचा निनावी कॉल आल्याने पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली.

घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, गणेश डहाळे आणि अमोल धामणे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून कॉलरचा शोध सुरू केला. अवघ्या काही वेळातच हा कॉल पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा गावातून आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून मयुर साळवे याला ताब्यात घेतले.

नागरिकांनी पोलीस हेल्पलाइनचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीतच करावा. अफवा पसरवणे किंवा खोटे कॉल करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

दहशतवादी पथकाकडून चौकशी
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, अहिल्यानगर येथील दहशतवादी विरोधी पथकाद्वारे आरोपीची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्याने केवळ खोटी अफवा पसरवण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाला त्रास देण्यासाठी हे कृत्य केल्याचे समोर आले. त्याच्याकडे कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा घातपाताचा कट असल्याचे आढळून आले नाही, मात्र त्याच्या या कृतीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल अंबादास टकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात आरोपी मयुर साळवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफवा पसरवून लोकसेवकांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार जी. एन. डहाळे करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  गाडी धुण्याच्या कारणावरून शस्त्राने हल्ला,
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ