सामाजिक कार्यकर्त्या सुनीता सोबले यांच्याकडून पाण्याचे टँकरने पाणी वाटप
पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील जवळा-कान्हुर पठार जिल्हा परिषद गटासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना (उबाठा) पक्षाकडून शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची घोषणा शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी यांनी केली.
जनगणगना नोंदणी प्रशिक्षण आणि 2 जूनला शिड येथे होणाऱ्या शिवसेना शिबिरानिमित्ताने जिल्हाप्रमुख यांनी घेतलेल्या बैठकीत या उमेदवारीबाबत सुतोवाच करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष दळवी म्हणाले की, पारनेरमध्ये महाविकास आघाडी झाली अथवा नाही, शिवसेना पक्षाच्यावतीने जवळा-कान्हुर पठार जिल्हा परिषद गटातून डॉ. श्रीकांत पठारे यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे. त्यांच्या या घोषणेमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसैनिकांच्या मेळाव्यात तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
पारनेर तालुक्यात महाविकास आघाडी अस्तित्वात असल्याने आघाडीच्या वतीने खासदार लंके हे तालुका व जिल्ह्याचे नेतृत्व करत आहेत. गत विधानसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई लंके यांना निवडणुकीत डॉ. श्रीकांत पठारे यांनी अपेक्षित सहकार्य केले नसल्याचा आरोप लंके व त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर पारनेरमधील महाविकास आघाडीत अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा सुरू होती. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी खासदार लंके यांनी जवळा-कान्हुर पठार गटातून मारुती रेपाळे यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे महाविकास आघाडीमधूनच डॉ. श्रीकांत पठारे यांच्याविरोधात उमेदवार उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
मात्र, जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी यांनी स्पष्ट शब्दांत डॉ. श्रीकांत पठारे हेच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर केल्यानंतर शिवसैनिकांमधील संभ्रम दूर झाला असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी झाली अथवा नाही, जवळा-कान्हुर पठार जिल्हा परिषद गटातून शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने डॉ. श्रीकांत पठारे यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी यांनी पारनेर येथे झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात दिले. पारनेर तालुक्यात महाविकास आघाडीच्या राजकारणावरून विविध चर्चा सुरू असताना जिल्हाध्यक्ष दळवी यांच्या या घोषणेमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गत विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील काही मतभेद समोर आले होते. त्यानंतर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत जवळा-कान्हुर पठार गटात कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू होती. मात्र, डॉ. श्रीकांत पठारे हेच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील, असे स्पष्ट जाहीर झाल्याने शिवसैनिकांमधील संभ्रम दूर झाला असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
मित्रपक्ष समोरासमोर उभे ठाकणार
जवळा-कान्हूर पठार जिल्हा परिषद गट हा खुला पुरुष प्रवर्ग असल्याने येथे इच्छुकांची मोठी भाऊगद आहे. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही प्रमुख घटकांनी आपापले उमेदवार शर्यतीत उतरवल्यामुळे पारनेर तालुक्यात महाविकास आघाडीत अधिकृतपणे बिघाडी निर्माण झाल्याचे चित्र आहे. डॉ. श्रीकांत पठारे हे उमेदवार असतील या शिवसेना जिल्हाध्यक्षांच्या आक्रमक भूमिकेनंतर आता आगामी काळात पारनेर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे मित्रपक्ष समोरासमोर ठाकणार का? हे येणारा काळच सांगणार आहे.
कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीला सामोरे जाणार : डॉ. पठारे
गेल्या सहा वर्षापासून जवळा व कान्हूर पठार जिल्हा परिषद गटात उमेदवारी करण्यासाठी तयारी करत आहे. या माध्यमातून गटातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले आहेत. शिवसेना पक्षाने नेहमीच महाविकास आघाडीचा धर्म पाळला आहे. येणाऱ्या काळातील निवडणुकीला कोणत्याही परिस्थितीत सामोरे जाणार आहे.










