- जाहिरात -spot_img
breaking news

युद्धाचा भडका; भारतात हाय अलर्ट, आज काय घडलं पहा

विमानसेवा कोलमडली, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या
नवी दिल्ली | वृत्तसंस्था

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील तणाव वाढला आहे. मोठ्या क्षेपणास्त्रांनी हल्ले केली जात आहेत. हेच नाही तर थेट इराणने अमेरिकेचा बदला घेण्यासाठी ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, त्यावर हल्ला करण्यास सुरूवात केली. इस्त्रायलवर सतत मिसाईलचा मारा सुरू आहे. अमेरिका इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा पूर्णपणे बंद आहे. दुबई विमानतळावर अनेकजण अडकून पडले आहेत. मध्य पूर्ण आशियात या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली. अमेरिका इराण युद्धाचा भडका उडाला आहे.

जवळपास ८ देशांमध्ये मोठे हल्ले इराणकडून करण्यात आली. ज्या ज्या देशात अमेरिकेचा लष्कर तळ आहे, त्याला इराण टार्गेट करत आहे. तेहरानमध्ये असंख्य हवाई हल्ले इस्त्रायल आणि अमेरिकेकडून केली जात आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना अमेरिकेकडून ठार करण्यात आले.आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्युनंतर तणाव प्रचंड वाढला. रविवारी पाकिस्तानमध्ये स्थिती गंभीर होती. राचीसह इस्लामाबादलच्या अमेरिकन दूतावास कार्यालयाला लोकांकडून टार्गेट करण्यात आले. अमेरिकन दूतावास कार्यालय जाळण्यात आले. मोठी तोडफोड करण्यात आली.

 

यानंतर पोलिसांनी गोळीबार केला आणि तब्बल १० जण ठार झाले.श्रीनगरमध्येही आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्युनंतर लोक रस्त्यावर जमताना दिसले. लेहमध्येही लोक मोठ्या संख्येने जमले होते. मात्र, अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता भारतात अलर्ट जारी करण्यात आला. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहिले आहे. हिंसाचाराबाबत हे पत्र लिहिण्यात आले. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर काही राज्यात लोक रस्त्यावर उतरले होते आणि विरोध दर्शवत होते.या पत्रात भडकाऊ भाषण देणार्‍या इराणी समर्थकांवर लक्ष ठेवणे आणि अशाप्रकारे भाषणे रोखण्याबाबत पत्रात लिहिण्यात आले. दिल्लीमध्ये एक महत्वाची बैठकही पार पडली. देशात कोणत्याही हिंसा होणार नाहीत, याकडे लक्ष देण्याबाबत यामध्ये लिहिण्यात आले. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्युनंतर पाकिस्तानमध्ये मोठी हिंसा भडकली होती. आता केंद्रीय गुप्तचर विभागाचे या गोष्टींवर बारीक नजर आहे.

हे सुद्धा वाचा :  पाऊस पडण्यासाठी गाभारा जलमय.... कामरगावकरांचे महादेवाला साकडे

जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये पाकिस्तानी ड्रोनच्या घिरट्या
जम्मू-काश्मीरमध्ये भारत-पाकिस्तान सीमाभागात पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा वाढू लागल्या आहेत. एकीकडे अफगाणिस्तान विरोधाच्या युद्धात पाकिस्तानचं मोठं नुकसान होत आहे. असं असतानाही पाकिस्तान भारताच्या हवाई हद्दीत ड्रोन पाठवण्याची हिंमत करत आहे. या घटना सातत्याने समोर येत आहेत. जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषा पार करुन एक पाकिस्तानी ड्रोन भारताच्या हद्दीत घुसण्याच्या तयारीत होता. पण भारतीस सैन्याच्या निदर्शनास येताच सैन्याने त्या ड्रोनच्या दिशेला गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामुळे ते ड्रोन परत पाकिस्तानच्या दिशेला पळून गेले. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांमधील ही दुसरी घटना आहे. ड्रोन दिगवार परिसरात काही क्षण घिरट्या मारत होते. त्यानंतर ते पाकव्याप्त काश्मीरच्या दिशेला परतले.सीमेवर तैनात असलेल्या एका सैनिकाने रविवारी पहाटे ६ वाजून १० मिनिटाच्या सुमारास पाकिस्तानचे ड्रोन पाहिले. त्यानंतर ते पाडण्यासाठी त्याच्या दिशेला गोळीबार केला. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ड्रोनने पहाटे पावणे सहा ते सहा वाजेच्या सुमारास भारताच्या हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. या ड्रोनवर गोळीबार केल्यानंतर ड्रोन तातडीने पाकिस्तानच्या दिशेला परत गेले.

इराणनं अमेरिकेचं एफ-१५ फायटर जेट पाडलं
मध्यपूर्वेतील युद्धात इराणने अमेरिकेला जबरदस्त धक्का दिलाय. इराणच्या संरक्षण दलानं कुवेतच्या हवाई हद्दीत अमेरिकेचे अत्याधुनिक एफ-१५ फायटर जेट पाडल्याचा दावा केलाय. या कारवाईमुळे दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष आता थेट युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकन हवाई दलाचे हे फायटर जेट इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात नष्ट झाले आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला असून तो व्हायरल होत आहे. युद्धाच्या तिसर्‍या दिवशी इराणने एक नवीन दावा केला आहे. इराणने सांगितले की, त्यांनी कुवेतवरून उड्डाण करणारे एक एफ-१५ लढाऊ विमान पाडले आहे. इराणने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये फायटर जेट हवेत आगीचा गोळा होत खाली पडताना दिसत आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ