- जाहिरात -spot_img
breaking news

तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराजांनी स्वतःवरच केले चाकूने वार; प्रकृती स्थिर, काय म्हणाले पहा

पाथर्डी / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर व बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी स्वतःवरच चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री उघडकीस आली आहे. या घटनेत महाराज गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मोठा भक्त परिवार असलेल्या आदिनाथ शास्त्री महाराजांनी स्वतःवरच वार केल्याचे समोर आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेमुळे त्यांच्या अनुयायांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे. सध्या त्यांच्यावर अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तारकेश्वर गडावर असताना महाराजांनी स्वतःवर चाकूने वार केले. ही बाब लक्षात येताच गडावरील भक्तांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात आणल्यावेळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून पुढील काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू राहणार आहेत.

पाथर्डी तालुक्यासह अहिल्यानगर व बीड जिल्ह्यात आदिनाथ शास्त्री महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे. या घटनेमुळे भक्तांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे तसेच भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी रुग्णालयात भेट देऊन डॉक्टरांकडून प्रकृतीची माहिती घेतली.

दरम्यान, महाराजांना विश्रांतीची गरज असल्याने कोणीही रुग्णालयात गर्दी करू नये, असे आवाहन आमदार मोनिका राजळे व युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केले आहे.

महाराजांनी स्वतःवर वार का केले? यामागे कोणता वाद किंवा अन्य कारण होते का? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र शस्त्रक्रियेनंतर महाराजांनी स्वतः एका व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया देत, “सध्या माझी प्रकृती स्थिर असून लवकरच मी गडावर परत येईल. त्यामुळे कुणीही चिंता करू नये,” असे आवाहन भक्तांना केले आहे.

हे सुद्धा वाचा :  भोंदूबाबा अशोक खरातच्या फार्महाऊसवर कोणते नेते जायचे? SIT चौकशीत सगळ्यांची नावं उघड
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ