अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहमदनगर मर्चन्टस् को-ऑप. बँकेच्या चेअरमन पदी संजय चोपडा यांची एकमताने निवड करण्यात आली.
अहमदनगर मर्चन्टस् को-ऑप. बँकेच्या चेअरमनपदी निवड करण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाच्या सदस्यांची सभा मंगळवार दिनांक 30 जून 2026 रोजी सहाय्यक निबंधक अधिन जिल्हा उपनिबंधक गणेश औटी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. चेअरमन पदी संजय फुलचंद चोपडा यांची एकमताने निवड करण्यात आली. चेअरमन पदासाठी संजय चोपडा यांचे नांव संचालक मोहनलाल बरमेचा यांनी सुचविले व त्यास संचालक अनिल हिरालाल पोखरणा यांनी अनुमोदन दिले.
या निवडीप्रसंगी सर्वश्र्ी मावळते चेअरमन हस्तीमलजी मुनोत, विद्यमान व्हाईस चेअरमन अमित मुथा, संचालक अनिल पोखरणा, आनंदराम मुनोत, संजय बोरा, किशोर गांधी, सीए आयपी अजय मुथा, सीए मोहन बरमेचा, किशोर मुनोत, संजीव गांधी, सुभाष बायड, श्र्ीमती प्रमिलाबाई बोरा, श्र्ीमती मीनाताई मुनोत, विजयराव कोथिंबीरे, सुभाषराव भांड कर्मचारी प्रतिनिधी जितेंद्र बोरा, प्रसाद गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल बाळकृष्ण पुराणिक, जॉईंट सी. ई. ओ. नितिन भंडारी आदि उपस्थित होते.संजय चोपडा हे शहरातील प्रख्यात उद्योजक असून महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत. तसेच यापुवही त्यांनी बँकेच्या चेअरमन पदाचा कार्यभार सांभाळलेला होता.या प्रसंगी सभाध्यक्ष गणेश औटी यांनी बँकेच्या नुतन चेअरमन यांचा सत्कार करून त्यांना त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व बँकेची उत्तरोत्तर भरभराट होण्यासाठी त्यांनी बँकेस शुभेच्छा दिल्या. यावेळी व्हाईस चेअरमन अमित मुथा संचालक, सर्वश्र्ी अनिल पोखरणा, संजीव गांधी, मीनाताई मुनोत, संजय बोरा, विजयराव कोथिंबीरे यांची भाषणे झाली.
बँकेचे नुतन चेअरमन संजय चोपडा यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की, बँकेचे संस्थापक हस्तीमलजी मुनोत यांनी बँकेला ज्या प्रगतीपथावर नेले आहे. तसेच बँकेचा नावलौकिक केलेला आहे. त्या नावलौकिकास मी कुठलाही तडा न जाऊ देता बँकेच्या नावलौकिकात अधिकाधिक भर घालील. सर्व संचालकांना सोबत घेऊन बँकेची प्रगती करील. हस्तीमलजी मुनोत यांचे जे स्वप्न होते, की सभासदांना रक्कम रूपये 5,100/- ची मुदत ठेव पावतीचा मी स्वतः पाठपुरावा करून प्रस्ताव मंजूर करून हस्तीमलजी मुनोत यांच्या हस्ते वितरित करण्यात येईल.बँकेचे संस्थापक व मावळते चेअरमन हस्तीमलजी मुनोत यांनी आपल्या भाषणात मी बँकेच्या ज्या प्रगतीचे स्वप्न पाहिलेले आहे. त्याच प्रकारे बँकेची प्रगती होत असून नुतन चेअरमन संजय चोपडा हे चेअरमन पदाची कामगिरी अत्यंत उत्कृष्टरित्या पार पाडतील असा विश्वास व्यक्त करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. संजय चोपडा यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.










