- जाहिरात -spot_img
breaking news

बापरे! अहिल्यानगरमध्ये अफूची शेती; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त, कोणत्या तालुक्यात घडला प्रकार पहा

कर्जत / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे प्रतिबंधित अफूच्या गवताची लागवड करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा आणि कर्जत पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जेरबंद केले. आरोपीच्या शेतातून तब्बल 47 लाख 64 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अंमली पदार्थांची लागवड व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक सक्रिय झाले होते.

पथक कर्जत पोलीस ठाणे हद्दीत माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत परमेश्वर बन्सी घनवट (वय 68, रा. चापडगाव ता. कर्जत) हा आपल्या शेतात प्रतिबंधित अफूच्या झाडांची लागवड करून त्याची निगा राखत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्जत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना माहिती देत संयुक्त कारवाईचा निर्णय घेतला.

सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, पोलीस अंमलदार संजय सानप, किरण जाधव, सचिन थोरात यांच्या पथकासह चापडगाव शिवारातील गट क्रमांक 13 मधील शेतावर छापा टाकण्यात आला. तेथे आरोपी शेतात राखण करताना आढळून आला. चौकशीदरम्यान त्याने दोन ते तीन महिन्यांपूर्वी अफूचे गवत लावून त्याची जोपासना करत असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीच्या शेतातून तब्बल 238.239 किलो वजनाची अफूची झाडे जप्त केली असून त्याची अंदाजे किंमत 47 लाख 64 हजार 180 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक शामसुंदर जाधव यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 93/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा 1985 अंतर्गत कलम 8(क) आणि 15(क) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि कर्जत पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

हे सुद्धा वाचा :  प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकरचे पाय खोलात!; गंभीर तक्रारी, आ. दाते, आ. पाचपुते थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ