- जाहिरात -spot_img
breaking news

वाडेगव्हाण येथे जमिनीच्या वादातून जीवघेणा हल्ला…..5 आरोपींना अटक

जेसीबीने घरे पाडली, पिस्तूल रोखून गोळीबार

सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण शिवारात शेतजमिनीच्या वादातून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात कंपाऊंड बांधण्याच्या कारणावरून पाच ते सहा अनोळखी इसम आणि दोन महिलांनी संगनमताने फिर्यादीच्या घराची तोडफोड केली, एवढेच नव्हे तर पिस्तूल रोखून हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे.

संदीप बापू काकडे (वय 27, रा. वाडेगव्हाण) यांनी फिर्याद दिली. ही घटना 13 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. काकडे आपल्या पत्नी व तीन मुलांसह गट नंबर 346 मधील पत्र्याच्या खोलीत वास्तव्यास होते. यावेळी काही अनोळखी इसम आणि दोन महिला तिथे आल्या. त्यांनी शेतजमिनीच्या व सीमावत भागात तारेचे कंपाऊंड बांधण्यावरून वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संशयितांनी आधी घरावर दगडफेक केली, त्यानंतर जेसीबीचा वापर करून फिर्यादीच्या पत्र्याच्या दोन खोल्या जमीनदोस्त केल्या.
एका आरोपीने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत पिस्तूलातून गोळीबार केला, मात्र सुदैवाने ती गोळी कोणालाही लागली नाही. महेश बाफना (रा. शिरूर) याच्या सांगण्यावरून हे लोक आले होते, असा आरोप फिर्यादीने केला आहे.

या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हर्षद बाळासाहेब मोहिते (19), धनंजयकुमार कैलाश शहा (21), विकास बाबुराव गवळी (31), वसीम रफिक शेख (32) आणि साजिद अब्दुल शकूर सय्यद (33) या पाच जणांना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेली कार, स्कुटी, हायवा ट्रक आणि जेसीबी जप्त करण्यात आले आहेत. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी हे करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  निवडणुकांच्या तोंडावर पारनेर बाजार समितीमध्ये खांदेपालट, सभापतीपदाच्या माळ पडली 'या' नेत्याच्या गळ्यात
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ