- जाहिरात -spot_img
breaking news

ती तुम्हाला खुश करण्यासाठी इथे आलेली नाही…; ऐश्वर्याला ट्रोल करणाऱ्यांना कंगना रणौत यांचं सडेतोड उत्तर

मुंबई / नगर सह्याद्री –
‘कान्स फिल्म फेस्टिवल 2026’ मध्ये बॉलिवूडसोबतच मराठी कलाकारांनीही उपस्थिति दाखवली. आपल्या सौंदर्याने आणि हटके स्टाइलने प्रेक्षकांना वेड लावले. ‘कान्स’ चे शेवटचे दिवस सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चनने आपल्या लूकने गाजवले. तिला पाहून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. मात्र ऐश्वर्याला आपल्या लूकमुळे ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.

ऐश्वर्या रायने ‘कान्स’मधील एका लूकमध्ये निळ्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला होता. त्यात ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती. मात्र काही नेटकऱ्यांनी तिला वजनावरून आणि रुपावरून ट्रोल केले. मात्र बॉलिवूड अभिनेत्री आणि राजकारणी कंगना रणौत यांनी ऐश्वर्याला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.

कंगना रणौत यांनी यांनी रविवारी इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली. त्यात त्यांनी ऐश्वर्याच्या दिसण्यावर आणि वजनावर टीका करणाऱ्या ट्रोलर्सवर जोरदार टीका केली. ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी या पोस्टचे समर्थन करत आहे. अभिनेत्रीने ऐश्वर्या राय बच्चनचा ‘कान्स’ लूकचा फोटो स्टोरीला पोस्ट केला आणि त्याच्याखाली एक मेसेज लिहून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले.

“फॅशन आणि स्टाइल हा स्वतःच्या अभिव्यक्तीचाच एक प्रकार आहे. ती म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा आणि स्वतःच्या वृत्तीचा प्रत्येकाचा स्वतःचाच अर्थ लावण्याचा एक मार्ग आहे. कोणत्याही स्त्रीचे कोणाशीही काहीही देणे लागत नाही. ‘ऐश’ (Ash) तर अतिशय सुंदर दिसत आहे! तुमच्यापैकी ज्यांना तिला वेगळ्याच रूपात पाहायचे आहे, त्यांनी मग स्वतःमध्ये काय कर्तृत्व आहे ते का दाखवून देत नाही? ती तुम्हाला खुश करण्यासाठी इथे आलेली नाही; ती स्वतःच एक अत्यंत तेजस्वी आणि दिमाखदार व्यक्तिमत्त्व आहे. जर तुम्हाला ‘रेड कार्पेट’वर वयस्कर स्त्रियांना पाहण्याची सवय नसेल, तर आता ती सवय लावून घ्या.

हे सुद्धा वाचा :  प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत धडक भयंकर प्रकार; रिवा अरोराने सांगितला सगळा प्रकार...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ