- जाहिरात -spot_img
breaking news

धर्मांतर प्रकरणाची सूत्रधार निदा खानचे राजकीय कनेक्शन उघड; धक्कादायक अपडेट समोर

नाशिक / नगर सह्याद्री –
नाशिकमधील धर्मांतर प्रकरणातील सूत्रधार निदा खान हिला पोलिसांनी संभाजीनगरमधून बेड्या ठोकल्या. आज तिला नाशिक कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मागील ४० दिवसांपासून फरार असलेल्या निदा खान हिला राजकीय आश्रय मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी निदा खानला संभाजीनगरमध्ये लपण्यासाठी मदत केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांना नोटीस बजावली आहे. पोलिसांनी मतीन पटेल यांचा मोबाईलही जप्त केला आहे.

नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान गेली ४ दिवस छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातल्या कैसर कॉलनीमधील घरामध्ये राहत होती. पोलिसांनी मागील २ दिवसांपासून निदा खानवर पाळत ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार, एक मे २०२६ पासून ती या परिसरात राहत होती अशी माहिती पोलिसांकडे होती. मात्र याबाबत त्या परिसरातील नागरिकांना, आजूबाजूच्या लोकांना कोणतीही कल्पना नव्हती.

या घरामध्ये निदा खान ही आई-वडील, भाऊ आणि मावशी यांच्यासोबत राहत होती. अत्यंत गुप्तपणे साध्या वेशातील जवळपास २० पोलिसांनी रेकी करून निदा खानला अटक केली. मतीन पटेल यांनी दोन महिन्यांपूर्वी नारेगाव येथील कौसर पार्क परिसरात एक नवीन घर (फ्लॅट) विकत घेतले होते. याच घरात निदा खानला ठेवण्यात आले होते.

नाशिक कोर्टात हजर करणार –
TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला आज नाशिक कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आी आहे. छत्रपती संभाजी नगरमधून पोलिसांनी निदा खान हिला अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर निदा खान फरार होती. धार्मिक भावना दुखावणे, महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना मदत करणे, विशिष्ट धर्माचे ट्रेनिंग देण्याचा निदा खानवर आरोप आहेत.

निदा खानने गरोदर असल्याचं कारण देत अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. नाशिक कोर्टाने अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेऊन अटक पूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याआधीच तिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणात राजकीय कनेक्शनही उघड झाले आहे. नाशिक पोलिसांकडून याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा :  पुन्हा बीड हादरलं!; तरुणावर सपासप वार, काय घडलं पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ