- जाहिरात -spot_img
breaking news

शेवगावची कन्या तेजस्वी सातपुते पुणे गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी 

शेवगावची कन्या तेजस्वी सातपुते पुणे गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी
शेवगाव | नगर सह्याद्री

शेवगावची कन्या तथा कर्तबगार आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या पदोन्नतीमुळे शेवगावचे नाव उंचावले आहे.

राज्यभर चर्चेत असलेल्या भोंदू खरात प्रकरणातील विशेष तपास पथकाची जबाबदारीही सातपुते यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे. त्यांच्या धाडसी, शिस्तबद्ध आणि समाजाभिमुख कार्यशैलीवर शासनाने दाखवलेला हा विश्वास मानला जात आहे. तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखत अनेक उल्लेखनीय उपक्रम राबवले. सातारा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकपदाच्या कार्यकाळातही त्यांनी गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेत प्रभावी कामगिरी बजावली.

मुंबईतील जबाबदाऱ्यांमध्येही त्यांनी आपल्या सक्षम नेतृत्वाची छाप सोडली होती. त्यांच्या उत्कृष्ट कार्यपद्धतीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंदू खरात प्रकरणाच्या एसआयटी तपास प्रमुखपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे तपास प्रक्रिया योग्य मार्गावर सुरू असून, भोंदू खरातचे अनेक उद्योग बाहेर आले आहेत. भोंदू खरातचा तपास योग्य मार्गाने केल्याने गुन्ह्याची कडी उलगडत चालली आहे. त्यांच्या या कामाची बक्षिसी म्हणून त्यांची पुणे गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्या या यशस्वी वाटचालीमुळे शेवगाव तालुक्याची मान उंचावली असून, तालुक्यातील विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हे सुद्धा वाचा :  पारनेरमध्ये धक्कादायक घटना, पुजार्‍याच्या नातवानेच फोडली मंदिराची दानपेटी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ