- जाहिरात -spot_img

पाडळी रांजणगाव सोसायटीत नाट्यमय घडामोडीनंतर ठराव मंजूर

नाट्यमय घडामोडीनंतर रंजना साठे यांच्या नावाने ठराव मंजूर

सुपा | नगर सह्याद्री
जय हनुमान सेवा सोसायटी,पाडळी रांजणगाव येथील बहुचर्चित जिल्हा बँक मतदार प्रतिनिधी ठराव पार पडला. मोठ्या नाट्यमय घडामोडी यानिमित्ताने घडून आल्या. सत्ताधारी गटाच्या वतीने रंजना एकनाथ साठे यांच्या बाजूने 10 तर विरोधी हौशीराम भाऊसाहेब करंजुले यांना अवघी 3 मते पडल्याने रंजना एकनाथ साठे यांच्या बाजूने ठराव मंजूर झाल्याचे संस्थेचे सचिव अविनाश ठुबे यांनी जाहीर केले.

खासदार निलेश लंके यांनी स्वतःची यंत्रणा लावत सत्ताधारी गटाचे 12 पैकी तब्बल 6 संचालक गळाला लावत सहलीसाठी पाठवले होते, परंतु यापैकी दोन संचालकाच्या कुटुंबांनी अपहरणाची तक्रार करत गुन्हे दाखल केल्याने गावात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे 10 जुलै रोजी होणाऱ्या व झालेल्या संचालक मंडळ बैठकीसाठी सहलीसाठी गेलेले संचालक सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतल्याने काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तोपर्यंत वेळ झाल्याने मिटिंग कोरमअभावी रद्द झाली.

पुन्हा दि.14 जुलै रोजी पार पडलेल्या संचालक मंडळ बैठकीत सर्व 13 संचालक उपस्थित होते. यावेळी सत्ताधारी गटाच्या वतीने रंजना एकनाथ साठे यांच्या बाजूने 10 तर विरोधी हौशीराम भाऊसाहेब करंजुले यांना अवघी 3 मते पडल्याने रंजना एकनाथ साठे यांच्या बाजूने ठराव मंजूर झाल्याचे संस्थेचे सचिव अविनाश ठुबे यांनी जाहीर केले. यावेळी सत्ताधारी बाजूने चेअरमन डी. बी. करंजुले, व्हा. चेअरमन अप्पासाहेब कळमकर, संचालक अप्पासाहेब साठे, गणेश कळमकर, संभाजी करंजुले, नंदाबाई कळमकर, कांतीलाल उबाळे, गणेश करंजुले, एकनाथ साठे, भगवान उघडे तर विरोधात साधना करंजुले, सुदाम साठे, वामन जाधव यांनी मतदान केले.

या निवडीसाठी खासदार लंके यांनी मोठी प्रतिष्ठा पणाला लावली होती, परंतु राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा पाडळी रांजणगावचे सरपंच विक्रमसिंह कळमकर व चेअरमन डी. बी. करंजुले यांनी पुन्हा जुळवा जुळव करून आपले नेतृत्व सिद्ध केले. रंजना साठे यांचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार सुजय विखे, आमदार काशिनाथ दाते, भाजपा नेते राहुल पाटील शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे.

हे सुद्धा वाचा :  जमीन विक्रीच्या वादातून सासऱ्याचा खून; प्रेयसीलाही ठार मारल्याची कबुली; एलसीबीने ठोकल्या बेड्या
Follow us:

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Follow us on

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ

आमच्याविषयी

राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारी पत्रकारीता करीत असताना रोखठोक आणि आक्रमक पत्रकारीता ही ‘नगर सह्याद्री’ची ओळख! ‘नगर सह्याद्री’ वाचला जातो तो वेगळ्या वैचारिक लिखाणासाठी! आम्ही परखड विचारांचा ‘सारिपाट’ मांडतो त्यासाठीच! लाळघोटणारी पत्रकारीता ‘नगर सह्याद्री’च्या टीमने कधी केली नाही आणि करणार पण नाही!

अहिल्यानगर कार्यालय

कुंदन नगरी अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा अहमदनगर महाराष्ट्र ४१४००१

© 2026 Nagarsahyadri.com