- जाहिरात -spot_img

ढवळपुरीत बिबट्याची दहशत; पाळीव कुत्र्याचा बळी

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाने पिंजरा बसविला
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील बोरवाक वस्ती परिसरात बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी (दि. 14) रात्री देवकाते बंधू भेळवाले यांच्या घरासमोर बिबट्या आढळून आला. यावेळी त्याने घरासमोरील पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

गेल्या काही दिवसांपासून बोरवाक वस्ती तसेच आसपासच्या शिवारात बिबट्याचा वावर असल्याच्या घटना समोर येत होत्या. अनेक ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले होते. मात्र, आता बिबट्या थेट मानवी वस्तीजवळ येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ले करू लागल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील युवकांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. गावातील वनविभागात कार्यरत असलेले फारूख शेख यांच्या सहकार्याने वनाधिकारी श्री. दावने यांच्याशी संपर्क साधण्यात आला. युवकांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात आणून दिल्यानंतर वनविभागाने तत्काळ दखल घेत आज संबंधित परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा बसविला.वनविभागाच्या या कारवाईमुळे ग्रामस्थांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी शेतात किंवा वस्ती परिसरात एकटे फिरणे टाळावे, पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत आणि बिबट्याचे दर्शन झाल्यास तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे.

दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांमध्ये उद्योजक संतोष थोरात, संभाजी थोरात, योगेश थोरात, जालिंदर थोरात, अनिल थोरात, बंडू कऱ्हे, सुरेश थोरात गौरव थोरात, श्री गवळी यांनी विशेष पुढाकार घेत सहकार्य केले.ग्रामस्थांनी वनविभागाकडे परिसरात नियमित गस्त वाढविण्याची तसेच बिबट्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्याची मागणी केली आहे. बिबट्याला लवकरात लवकर पकडण्यात यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा :  पुणे दारू दुर्घटनेनंतर नगर पोलीस ऍक्शन मोडमध्ये; कंपनीचे सर्व्हर हॅक करून ३७ लाखांची, व्यापाऱ्याची अन नोकरीच्या आमिषाने वृद्धाची फसवणूक
Follow us:

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Follow us on

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ

आमच्याविषयी

राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारी पत्रकारीता करीत असताना रोखठोक आणि आक्रमक पत्रकारीता ही ‘नगर सह्याद्री’ची ओळख! ‘नगर सह्याद्री’ वाचला जातो तो वेगळ्या वैचारिक लिखाणासाठी! आम्ही परखड विचारांचा ‘सारिपाट’ मांडतो त्यासाठीच! लाळघोटणारी पत्रकारीता ‘नगर सह्याद्री’च्या टीमने कधी केली नाही आणि करणार पण नाही!

अहिल्यानगर कार्यालय

कुंदन नगरी अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा अहमदनगर महाराष्ट्र ४१४००१

© 2026 Nagarsahyadri.com