माजी मंत्री शंकरराव गडाखांकडून सलग तिसऱ्यांदा कार्यकर्त्यांना पदाधिकारी निवडीत संधी
सोनई | नगर सह्याद्री
मुळा कारखान्याच्या चेअरमनपदी भाऊसाहेब निवृत्ती मोटे तर व्हा चेअरमनपदी बाळासाहेब दादा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजीमंत्री शंकरराव गडाखांकडून सलग तिसऱ्या पंचवार्षिकला पदाधिकारी निवडीत कार्यकर्त्यांना संधी देण्यात आल्याने या नवीन पायंड्याचे कौतुक केले जात आहे.
प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत केलेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांनी चेअरमनपदी भाऊसाहेब निवृत्ती मोटे तर व्हा, चेअरमनपदी बाळासाहेब दादा पाटील यांच्या निवडी जाहीर केल्या.माजीमंत्री शंकरराव गडाख यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या सन्मान केला. याप्रसंगी मुळाचे मा. चेअरमन नानासाहेब तुवर, मा.व्हा. चेअरमन कडूबाळ कर्डिले, नवनिर्वाचित चेअरमन भाऊसाहेब मोटे आदींनी मनोगत व्यक्त केले.
मा.मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, कारखाना सभासदांनी मोठा विश्वास आपल्यावर दाखवलेला आहे. नूतन संचालक मंडळाने सभासद, शेतकरी यांना केंद्रस्थानी मानून काम करावे. कारखाना ही परिसरासह तालुक्याची कामधेनु आहे. सभासदांनी मुळा कारखान्याला ऊस द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मी स्वतः लक्ष घालून कारखाना गळीत हंगामाचे नियोजन करणार असल्याचे सांगितले.
संचालक मंडळाच्या बैठकीचे औचित्य साधून कारखान्याने मिल रोलरचे पूजन करण्याचा कार्यक्रम माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत आयोजीत केला होता. कारखान्याचे संचालक पांडुरंग निपुंगे, एकनाथ जगताप यांच्याहस्ते रोलरचे विधीवत पूजन करण्यात आले.याप्रसंगी ज्ञानेश्वर देवस्थानचे हभप देविदास महाराज म्हस्के, जेष्ठ नेते विश्वासराव गडाख, दादासाहेब शेळके, कारभारी जावळे, नंदकुमार पाटील, भाऊसाहेब लांडे, भाऊसाहेब निमसे, प्रभाकर कोलते, कैलास जाधव, बाळासाहेब नवले, अरुण सावंत, राजेंद्र सानप, वसंतराव सोनवणे, मदनराव डोळे, कारभारी डफळ, बाबुराव चौधरी, बबन दरंदले, संजय जंगले, बाळासाहेब गोरे, बाळासाहेब बनकर, आप्पासाहेब निमसे, बाबासाहेब आखाडे, गोरक्षनाथ दरंदले, मुकुंद भोगे, संचालक बाळासाहेब भणगे, त्रिंबक सुकाळकर, शंकरराव कदम, बाळासाहेब परदेशी, प्रकाश भालके, दिनकर घावटे, लक्ष्मण पांढरे, दत्तात्रय बऱ्हाटे, सोपान विरकर, ज्ञानेश्वर दरंदले, चंद्रकांत टेमक, कमलताई दहिफळे, विमलताई सोनवणे, छायाताई भुसारी आदींसह विविध संस्थाचे पदाधिकारी, सभासद, शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते. कारखान्याचे सचिव रितेश टेमक यांनी सूत्रसंचालन केले. आभार कार्यकारी संचालक शरदराव बेल्हेकर यांनी मानले.










