- जाहिरात -spot_img
breaking news

वादळी पावसाने शहराला झोडपले; केडगावात दाणादाण, शॉर्टसर्किट होऊन दूध डेअरी जळाली…

शॉर्टसर्किट होऊन दूध डेअरी जळून खाक
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
रविवारी रात्रीच्यासुमारास सुमारास अचानक झालेल्या वादळी अवकाळी पावसाने नगर शहर व उपनगरा चांगलीच दाणादाण उडाली. सोसाट्याचा वारा आणि पाऊसामुळे नुकसान झाले. सुमारे अर्धातास पाऊस पडला. या अर्धातासाच्या पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी वीजेचे खांब कोसळले. यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. खंडीत वीज पुरवठ्यामुळे नागरिकांना अंधारात रात्र जागून काढावी लागली आहे.

हवामान खात्याने नगर जिल्ह्यात 3 जूनपर्यंत पावसाचा अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नगर शहरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाला. अचानक सुरू झालेल्या वादळी पावसाने नगरकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. जोरदार वारे आणि पावसामुळे शहर व उपनगराच्या विविध भागात झाडे, उन्मळून पडण्याच्या, वीजेचे खांब पडल्याचे तसेच फ्लेक्स बोर्ड उडाल्याच्या घटना घडल्या. कोठला भागात वीजेची डिपी कोसळून पडली. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. मिस्किन मळा येथे भलेमोठे झाड रस्त्यावर पडले होतेे. वादळी वाऱ्याचा नगर शहाराला फटका बसला. कोठी भागात पाटील हॉस्पिटलच्या बांधकामासाठी उभारण्यात आलेली परास शेजारील घरावर कोसळली. मॅककेअर हॉस्पिटल जवळ एका पत्र्याच्या गोडावून नुकसान झाले. छत्रपती संभाजी नगर रोडवर झाडे पडली. विजेचे खांब पडले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. शहराच्या बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडीत झाला. काही वेळ आलेले जोरदार वादळ आणि हलक्या पावसाने शहराला मोठा फटका बसला आहे.

शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
वादळी पावसाने रविवारी रात्री 8.30 ते आज सोमवार पहाटे 3.30 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे पाणी उपसा बंद पडला. परिणामी पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता आल्या नाहीत. आज मंगलगेट, झेडीगेट ,सर्जेपुरा, रामचंद्र खुंट, दाळमंडई, जुने कलेक्टर ऑफिस परिसर, हातमपूरा, धरतीचौक, बंगाल चौकी या भागासह गुलमोहर रोड, सिव्हील हडको, समता नगर, पंकज कॉलनी, लॉईड बिशप, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टी.व्ही. सेंटर परिसर, म्युनिसीपल हाडको, बायजाबाई निर्मलनगर, शिवनगर, डोकेनगर, बालिकाश्रम रोड परिसर, मार्कंडेय,रामकृष्ण कॉलनी, सावेडी तसेच नागपूर बोल्हेगाव या भागाचा पाणी पुरवठा बंद राहिला. या भागास मंगळवारी पाणी पुरवठा करण्यात येईल. सिद्धार्थ नगर, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, तोफखाना, जुने मनपा कार्यालय परिसर, पंचपीर चावडी, कापड बाजार खिस्त गल्ली या भागास मंगळवारऐवजी बुधवारी पाणी पुरवठा होईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा :  घरफोडीतील सराईत आरोपींना बेड्या; कचरा उचलण्यावरून राडा, टेम्पो घासल्याने जीवे मारण्याची धमकी...

केडगावात वादळी पावसाने दाणादाण
शॉर्टसर्किट होऊन दूध डेअरी जळून खाक
अहिल्यानगर | नगर सह्याद्री-
शहरात रविवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने दाणादाण उडवून दिली. पावसापेक्षा वादळ अधिक असल्याने केडगावात नुकसान झाले. केडगावातील नगर- पुणे महामार्गावरील शिवशक्ती दूध डेअरीत विजेचा दाब कमी-अधिक होऊन शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत डेअरी जळून खाक झाली. डेअरीचालक संतोष नानाभाऊ कोतकर यांचे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. विजेचा दाब कमी- अधिक होऊन केडगावातील अनेकांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाले आहे.

यावर्षी तापमानवाढीने उच्चांक केला असून, जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंशापर्यंत पोहोचला आहे. कडक उन्हाने अंगाची लाहीलाही झाली असून, वाढत्या तापमानाचा फटका सर्वांना बसत आहे. रविवारी दिवसभर कडक उन्हानंतर सायंकाळी ढग वाटून आले. त्यानंतर जोरदार वारे सुटले. जोरदार वारे व धुळीने दिसेनासे झाले. जोरदार वाऱ्यामुळे झाडे पडली. पत्रे उडून गेले. तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. शहरासह केडगावात या वादळाने मोठे नुकसान झाले. केडगावातील शिवशक्ती दूध डेअरीत शॉर्टसर्किट होऊन चार फ्रीज, कुलर जळून गेले. याशिवाय दुकानातील तुप, दूध, खाद्यपदार्थ, क्रीम, फॅट मशीन, टीव्ही, कॉम्प्युटर, कॅमेरा, टेबल, खुच, काउंटर, कॅमेऱ्याचे डीव्हीआर तसचे गल्ल्यातील रोख रक्कम 70 हजार असे मिळून साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी सकाळी केडगावचे तलाठी यांनी पंचनामा केला. यामुळे शासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी डेअरीचालक संतोष कोतकर यांनी केली आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ