- जाहिरात -spot_img
breaking news

बेकायदेशीर जाहिरातबाजी भोवली; महापालिकेने काय केले पहा

मालमत्ता विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहराचे सौंदर्य बिघडवत सार्वजनिक मालमत्तेवर विनापरवाना जाहिरातबाजी करणाऱ्या एकावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टेशन रोडवरील उड्डाणपुलाच्या खांबांवर बेकायदेशीर जाहिरात फलक लावल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी शेख अजीम यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. मार्केटयार्ड चौक ते कोठी चौक दरम्यान असलेल्या उड्डाणपुलाच्या खांबांवर ‘ओम साई डेव्हलपर्स’च्या वतीने प्लॉट विक्रीची विनापरवाना जाहिरातबाजी करण्यात आली होती. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण झाले आहे.

​याप्रकरणी पोलिसांनी ऋषी गोरक्ष गोते (रा. उरळी कांचन) याच्यावर महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा नोंदविला आहे. विनापरवाना फलक लावून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेकडून कडक भूमिका घेतल्याने संबंधित विकासकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत. शहरातील अनधिकृत जाहिरातबाजीला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने मोहिमा राबवल्या जात असूनही असे प्रकार घडत आहेत.

हे सुद्धा वाचा :  नगरसेविका अजमेरे यांच्या विरोधातील अपात्रतेचा अर्ज फेटाळला
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ