- जाहिरात -spot_img
breaking news

कारभार सुधारला नाहीतर आंदोलन; भाजप नगरसेवकांचा इशारा

राहुरी | नगर सह्याद्री
राहुरी नगरपालिकेच्या सत्ताधारी गटाकडून आम्हाला दुय्यम वागणूक दिली जात असून कुठल्याच कामांमध्य विचारत घेतले जात नाही. ज्या नागरिकांनी आम्हाला निवडून दिले, त्या नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनही नगरसेवकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप करत हा कारभार सुधारला नाहीतर आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागणार असल्याचा इशारा भाजप पुरस्कृत परिवर्तन गटाच्या नगरसेविकांनी पत्रकार परिषदेत दिला.

माजी आ.स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून शहरातील 13 विविध विकासकामे मंजूर आहे, मात्र याची वर्क ऑर्डर नाही, असा आरोप सचिन भोंगळ व सुजय काळे यांनी केला. आमच्या पाच नगरसेवकांना सन्मान दिला जात नाही. बैठकीमध्ये आमच्या कामांना प्राधान्य दिले जात नाही. प्रत्येक वेळी आम्ही तक्रार अर्ज करूनही दखल घेतली जात नाही. कामाबाबत दुर्लक्ष केले जाते. यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप नगरसेविका प्रियांका काशिद यांनी केला.

आमचा वॉर्डात अत्यंत दुरवस्था झाली आहे, वेळोवेळी अर्ज करतो पण दखल घेतली जात नाही. नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आमच्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. नगरपरिषदेच्या मागील बाजूला ग्रामीण रुग्णालयासमोरील शौचालयाची दुरावस्था झाली आहे. कुठलीच सोय नाही, तर अनेक वेळा विविध कामांसाठी डझनभर अर्ज दिले आहेत पण माझ्या कामाकडे दुर्लक्ष केले जाते, बाकीच्या कामाला प्राधान्य दिले जाते पण आमच्या कामांना प्राधान्य दिले जात नाही, असा आरोप नगरसेविका प्रसन्ना वराळे यांनी केला.

यावेळी परिवर्तन गटाचे विरोधी पक्षनेते अरुण साळवे, गटनेते राजेंद्र उंडे, ज्येष्ठ नेते प्रकाश पारख, सचिन भोंगळ, सुनिल पवार, सतीश फुलसौदर, विक्रम भुजाडी, अक्षय तनपुरे, अमोल काशिद, सुजय काळे, नयन शिंगी, राजेंद्र वराळे, प्रियंका काशिद, सिंधुताई डावखर, दिनेश उंडे, सचिन मेहेत्रे कांतीलाल जगधने, मनिषा भोंगळ, प्रसन्ना वराळे, मनिषा बर्डे, उमेश शेळके, अजित डावखर, सतीश फुलसौदर, अरूण डौले, बाबासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  उष्णता वाढली; लवकरच पावसाची एन्ट्री, कोकणात कधी येणार पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ