- जाहिरात -spot_img
breaking news

संत निळोबाराय तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : राज्यमंत्री इंद्रनील नाईक

संत निळोबाराय पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
पारनेर | नगर सह्याद्री

श्री संत निळोबाराय तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री यांच्या माध्यमातून या परिसरातील रस्ते व विविध योजना विकासासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहे. तीर्थक्षेत्रला ‌‘अ‌’ दर्जा देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी आल्यानंतर प्रत्यक्षात पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन आपल्याला झाल्याची प्रचिती आपल्याला आली असून, परिसर विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली.

प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पिंपळनेर येथील निळोबाराय पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आ. काशिनाथ दाते, समाधान महाराज शर्मा, विकासानंद मिसाळ महाराज, जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आनंद भंडारी, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे, तहसीलदार गायत्री सौदाणे, गटविकास अधिकारी दिलीप सोनसकुसळे, पालखी सोहळा प्रमुख गोपाळ बुवा मकाशीर, पिंपळनेर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव सावंत, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रशांत गायकवाड, सुरेश पठारे, लक्ष्मण खामकर, चांगदेव शिर्के, माजी सरपंच भाऊसाहेब लटांबळे, सुभाष पठारे आदी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री संत निळोबाराय यांचे पूजन मंत्री नाईक, आमदार व जिल्हाधिकारी यांच्याहस्ते करण्यात आले. ही मानाची नवव्या क्रमांकाची पालखी व दिंडी असून, यामध्ये पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेकडो दिंड्या सहभागी होत असतात.
या वेळी पालखी व दिंडीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. सुवासिनींनी पालखीचे औक्षण केले. यावेळी जय हरी विठ्ठल नामाचा गजर आसमंत दणाणून गेला होता. यावेळी मोहनानंद परंडवाडेकर यांचे कीर्तन झाले. समाधान महाराज शर्मा व विवेकानंद मिसाळ महाराज यांनी मार्गदर्शन केले.

देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव सावंत म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील संत निळोबाराय देवस्थानचा लौकिक राज्यभर असून प्रत्येक एकादशीला या ठिकाणी भाविकांची मोठ्या संख्येने गद असते, मात्र पिंपळनेरकडे येणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने मंत्री इंद्रनील नाईक यांनी या बाबीची दखल घेऊन रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्याची मागणी केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपळनेरसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने पिंपळनेर या तीर्थक्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचे सांगितले. आमदार काशिनाथ दाते यांनी निळोबाराय क्षेत्राला जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांची कामे लवकर माग लावण्यासाठी मंत्री नाईक यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तीर्थक्षेत्र निळोबाराय देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे माग लागली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे. माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे या तीर्थक्षेत्रासाठी विशेष लक्ष व प्रेम असल्याने त्यांचे या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात योगदान असल्याचे आमदार दाते यांनी सांगितले. गोपाळबुवा मकाशीर महाराज, जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश पठारे यांनी आभार मानले.

हे सुद्धा वाचा :  वाढीव मालमत्ता कर नोटिसांवर नगरसेवक योगीराज गाडेंचा आक्षेप
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ