- जाहिरात -spot_img
breaking news

अस्वच्छतेचा ठपका : हॉटेल सगम, सत्कारचे परवाने निलंबित

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अस्वच्छतेचा ठपका ठेवत स्टेशन रस्त्यावरील हॉटेल सगम, सत्कारसह सहा हॉटेलचे परवाने अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

त्यामुळे शहरातील हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्याचे आयुक्त तुकाराम मुुंडे यांनी राज्यात अन्न व औषध प्रशासनस विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्वच अस्थापनांवर कारवाईचा धडका लावला आहे. स्वच्छतेसह अन्य नियमांचे पालन न करणाऱ्या हॉटेलवरही कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याने अधिकाऱ्यांनी शहरातील अनेक हॉटेलची तपासणी केली. त्यात हॉटेल सगम, हॉटेल सत्कार या दोन हॉटेलवर कारवाई करण्यात आली. हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळल्याचा ठपका ठेवत परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या कारवाईमुळे इतर हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.

हे सुद्धा वाचा :  कांदा उत्पादक अडविणार नगर-कल्याण महामार्ग; नेमकं कारण काय पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ