- जाहिरात -spot_img
breaking news

दुर्दैवी! विजेचा धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, क्षणात सर्वकाही संपलं

सातारा / नगर सह्याद्री –
साताऱ्यातून भयंकर घटना समोर आली. विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील खामगावात ही घटना घडली. घरासमोरील विद्युत केबलच्या तारेला स्पर्श होऊन सर्वांचा मृत्यू झाला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे. फलटण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ राहणारे शिंदे कुटुंब बुधवारी पहाटे नेहमीप्रमाणे उठून घराबाहेर आले होते. सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घराबाहेरील विद्युत तारेमध्ये अचानक वीज प्रवाह उतरल्याने पिसुरड्या किसन शिंदे (वय ४८) यांना विजेचा जोरदार झटका बसला. त्यांना वाचविण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्य धावून गेले.

गंगुबाई पिसुरड्या शिंदे (वय ४६), सचिन पिसुरड्या शिंदे (वय २६) आणि आरती पिसुरड्या शिंदे (वय २२) यांनी पुसुरड्याला वाचवण्यासाठी तातडीने धाव घेतली. मात्र, दुर्दैवाने विद्युत प्रवाहाची तीव्रता इतकी जास्त होती की, वाचविण्यास गेलेले तिघेही जण एकापाठोपाठ एक त्या प्रवाहाच्या संपर्कात आले आणि काही क्षणांतच चौघांचाही जागीच मृत्यू झाला.

या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा सविस्तर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले आहेत. हे सदरची घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. एकाच घरातील चार व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे सुद्धा वाचा :  खोटा गुन्हा दाखल करणे पोलीस उपनिरीक्षकास भोवले; एसपींनी घेतला मोठा निर्णय
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ