अहिल्यानगर | नगर सह्याद्री
साधू संतांच्या विचारांच्या महाराष्ट्राने कायमच देशाला दिशा दिली आहे. या देशाला व महाराष्ट्राला जगावर आलेल्या संकटात कुठलाही धक्का लागू देऊ नको, अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी करून या भारतभूमीत सर्च भक्त, शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, कष्टकरी सुखाने नंदू दे व भारताची, हिंदू धर्माची संस्कृती, विचारधारा अशीच पुढे गेली पाहिजे, अशा भावना आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केली. आषाढी एकादशीनिमित्त सर्वत्र विठ्ठलमय झालेल्या वातावरणात वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे जाण्यासाठी मनोभावे विठ्ठलाच्या मूर्तीचे व स्व.अरुणअकाका जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात शनिवारी गुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणात विठ्ठलाच्या महापूजेचे व माजी आमदार स्व.अरुणकाका जगताप यांच्या प्रतिमेच्या पूजनाचे आयोजन आ.संग्राम जगताप यांच्या वतीने करण्यात आले. यासाठी आकर्षक सजावट करून विठ्ठलाची भव्य मूर्ती व. अरुणअकाका जगताप यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. पुरोहितांच्या वेदो मंत्रोच्चारात नगरसेविका शीतल ढोणे, अजय ढोणे व प्रा.माणिक विधाते यांच्या हस्ते विठ्ठलाची पाद्यपूजा झाल्यावर स्व.अरुणकाका जगताप यांच्याही प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आ. संग्राम जगताप यांच्यासह सर्वांनी विठ्ठलाची महाआरती केली. यावेळी महायुतीचे नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ.जगताप म्हणाले, जगताप परिवार गेल्या ६५ वर्षांपासून वारकरी संप्रदाय जपत असून आता चौथी पिढी पंढरपूरची पायी वारी करत हा वारसा जपत ही धर्माची, संस्कृतीची विचारधारा पुढे नेत आहे. या वर्षीच्या आषाढीला आपले अरुणकाका आपल्यात नाहीत. त्यामुळे त्यांना अभिप्रेत होईल असा पांडुरंगाच्या महापूजा व आरतीचा आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन केले.
कार्यामाचे प्रास्ताविक नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केले. माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, गुणे आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे सचिव डॉ.विजय भंडारी यांच्यासह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.










