- जाहिरात -spot_img
breaking news

पत्नी व मुली पाठोपाठ बाराव्यादिवशी डॉक्टर पतीचा मृत्यू …. कोठे घडली घटना

पाथर्डी | नगर सह्याद्री
जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथील माजी सरपंच व पाथर्डी तालुका दूध संघाचे माजी संचालक रावसाहेब पाटील मरकड व त्यांच्या कुटुंबावर तिघांच्या मृत्यूमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

डॉक्टर अनिल मरकड हे बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली येथे सहाय्यक नियंत्रक या पदावरती कार्यरत होते . बारा दिवसापूव ते दापोली वरून निवडूंगे या त्यांच्या गावी काही दिवस सुट्टीसाठी आले होते. सुट्टी संपून जात असताना मागच्या शनिवारी पोलादपूर जवळ त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. अपघातात त्यांच्या पत्नी सुवर्णा मरकड व मुलगी अनुश्री यांचे जागीच मृत्यू झाला. तर मुलगा चिन्मय याला किरकोळ जखम झाली होती. आणि डॉ. अनिल यांच्यावर मेंदूत अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे दहा-बारा दिवसापासून नेरूळ येथील आपोले हॉस्पिटल येथे उपचार चालू होते. त्या उपचार दरम्यान त्यांचे काल दुपारी दुःखद निधन झाले.

सोमवारी त्यांच्या मुलीचा आणि पत्नीचा दहावा होता. त्यानंतर लगेचच दोन दिवसात त्यांचेही निधन झाले. आठ वर्षाचा चिन्मय हा मुलगा आपल्या आई वडील आणि बहिणीला कायमचा मुकला. बुधवारी सकाळी डॉक्टर अनिल यांच्यावर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस सगळे ग्रामस्थ व उपस्थित भाऊक झाले होते. या कुटुंबावर मोठा आघात झाला. सुवर्ण या दापोली येथे एसबीआय बँकेमध्ये वरिष्ठ अधिकारी होत्या. तर मुलगी ही दहावीचे शिक्षण घेऊन पुढील शिक्षण घेणार होती पण त्यातच काळाने हा घात केला. या कुटुंबाची मोठी हानी झाली. डॉक्टर अनिल मरकड 2007 पासून दापोली विद्यापीठांमध्ये अत्यंत परिचित व लोकप्रिय प्राध्यापक होते. मनमिळाऊस व शांत स्वभावाने त्यांनी अनेकांचे मने जिंकली होती व त्यांना या कामामुळेच नियंत्रक म्हणून बढती पण मिळाली होती.
येथील ज्येष्ठ पत्रकार व कानिफनाथ देवस्थानचे माजी उपाध्यक्ष किशोर मरकड यांचे ते चुलत बंधू होत. अंत्यसंस्काराच्या वेळी आ. मोनिका राजळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात जनसमुदाय व स्थानिक राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  जिल्हा बँकेसह ज्ञानेश्वर, मुळा, वृध्देश्वर कारखान्यांच्या निवडणुका आता दिवाळीनंतरच
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ