- जाहिरात -spot_img
breaking news

नगरसेविका अजमेरे यांच्या विरोधातील अपात्रतेचा अर्ज फेटाळला

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
कोपरगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेविका सोनल अजमेरे यांची निवड रद्द करण्यासाठी प्रकाश दुशिंग यांनी दाखल केलेला अपात्रतेचा अर्ज जिल्हाधिकारी यांनी नुकताच फेटाळून लावला आहे.

सोनल अजमेरे यांची कोपरगाव नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्यानंतर प्रकाश दुशिंग यांनी नगरसेवकांसाठी कायद्याप्रमाणे असणाऱ्या पात्रता अजमेरे धारण करत नाहीत, त्यामुळे त्यांना अपात्र करावे, यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे वकिलामार्फत अर्ज दाखल केलेला होता.

जिल्हाधिकारी यांनी सोनल अजमेरे यांना नोटीस काढलेली होती. त्यानंतर अजमेरे यांचेवतीने ॲड. गोरक्ष पालवे यांनी जिल्हाधिकारी यांचेसमोर युक्तिवाद केला. अर्जदार प्रकाश दुशिंग यांनी केलेला अर्ज हा कायद्यातील तरतुदीमध्ये नसून कायद्याप्रमाणे अशा स्वरूपाचा अर्ज करण्याचा त्यांना अधिकार नसल्याची बाब जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास ॲड. गोरक्ष पालवे यांनी आणून दिली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्रकाश दुशिंग यांचा अर्ज फेटाळून लावला.

नगरसेविका अजमेरे यांचे वतीने गोरक्ष पालवे यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड. गुरविंदर पंजाबी, ॲड. सागर गर्जे,ॲड.रोहित बुधवंत ॲड.राहुल दहिफळे, ॲड.विशाल वांढेकर, ॲड.धनश्री खेतमाळीस, ॲड.रोहित चांडवले, ॲड.विवेक बडे, ॲड.पुष्कर बिडवाई, ॲड.प्रवीण निंबाळकर, ॲड.विवेकानंद बडे ॲड.तेजस राख,ॲड. भक्ती तमनर, बाळकृष्ण गीते, यश केकान यांनी सहाय्य केले.

हे सुद्धा वाचा :  पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद, कसा पकडला पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ