- जाहिरात -spot_img
breaking news

नगरमध्ये श्रीरामनवमी मिरवणूक शांततेत; पोलिसांचा चोख बंदोबस्त…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
श्रीरामनवमी निमित्त गुरुवारी शहरातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. तब्बल दहा वर्षानंतर जुन्या पारंपारिक मार्गानेच मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत प्रभू श्रीराम व वीर हनुमान यांचे पुतळे, वीर हनुमानाच्ची व्यक्तिरेखा साकारलेले भक्त सहभागी झाले होते. दरम्यान, डीजेच्या दणदणाटात मिरवणूक पार पडली. दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांनी जय श्रीराम, जय श्रीरामच्या गाण्यावर जल्लोष केला.

दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूक सुरू करण्यात आली. सकल हिंदू समाज, वास्तव कंपनी ग्रुप व बोल्हेगाव ग्रामस्थ अशा तीन संघटना मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. हिंदुत्ववादी  कार्यकत्यांची जुन्या मार्गाने मिरवणूक काढण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, अकरा वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीमुले पोलिसांनी नवीन मार्गानेच मिरवणूक जाईल, अशी व्यवस्था केली होती.

बुधवारी रात्री उशिरा आमदार जगताप यांनी पोलिस प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर जुन्या मार्गानेच जय श्रीरामच्या जयघोषात मिरवणूक मार्गस्थ झाली.मिरवणूक मार्गावर फटायांची आतषबाजी करण्यात आली. अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी, कर्मचारी मिरवणूक मार्गावर तळ ठोकून होते. मिरवणूक मार्गावर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ड्रोनद्वारे मिरवणुकीवर वाँच ठेवण्यात आला होता. मिरवणुकीत आशा टॉकीज चौकात अखंड हिंदुस्थानचा नकाशा असलेले फलक, लव्ह जिहाद व अफजल खानाच्या वधाचे फलक युवकांनी झळकावले. रात्री उशिरा मिरवणुकीची सांगता झाली.

हे सुद्धा वाचा :  आजचे राशी भविष्य १४ जून २०२६
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ