मुंबई | नगर सह्याद्री
वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण यावरून वाद पेटला आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीने गेल्या एक महिन्यापासून याविषयावर बॅनरबाजी आणि जाहीर वक्तव्य केल्याने काही वारकरी भडकले आहेत. शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी यापूर्वी जाहीरपणे वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण यावर भाष्य केले. त्यावरून हभप संग्राम भांडारे यांनी सहकार्यांसह त्यांच्यावर शाईहल्ला केला. हवेली तालुयातील आळंदी मातोबाची इथं भंडारे यांनी लवांडे यांच्या अंगावर शाई ओतली. त्यानंतर लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठत संग्राम भंडारे यांच्याविरोधात तक्रार दिली.
या सर्व घटनेत विकास लवांडे यांनी बाजू मांडली. त्यांनी ट्वीट केले आहे. वारकर्यातील नथुराम गोडसे अर्थात गुंड संग्राम भंडारे आणि काही १०/१५ गुंड गोरक्षक यांनी तीन फोर व्हीलर मध्ये आले होते. आज माझे आळंदी मातोबाची तालुका हवेली येथे प्रवचन संपल्यानंतर आत्ता १० वाजता मी परत असताना माझी गाडी अडवून माझ्या अंगावर शाही ओतली आणि मला धक्काबुक्की केली पिस्तूल दाखवला आहे. नंतर पळून गेले. पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब त्या सर्व माझ्यावर हल्ला करणार्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करावा.
आळंदी म्हातोबाचीमध्ये विकास लवांडेवर शाईफेक
हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची इथं सकाळी १० वाजता ही घटना घडली. शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर ही शाईफेक करण्यात आली. हभप संग्राम भंडारे यांनी साथीदारांच्या मदतीने ही शाईफेक केली. यावेळी भंडारे हे त्यांच्यावर ओरडत असताना दिसतात. लवांडे, तू लक्षात ठेव. आमच्यावर काहीही बोल, काही फरक पडत नाही. पण आमच्या गुरुवर्यावर टीका करू नको असे भंडारे बोलत होते. गुरुवर्यांवर टीका केल्यानेच आपण लवांडे यांच्यावर शाईफेक केल्याचाा दावा हभप संग्राम भंडारे यांनी केला.
लवांडे यांना पोलीस संरक्षण द्या ः आ. रोहित पवार
सर्व घटनाक्रमावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. महाराष्ट्राच्या थोर वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेल्या कट्टरतावाद्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून पुराव्यांसह आवाज उठवत आहेत. त्याचाच राग मनात धरून आज विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्यांच्या गुंडांनी शाई ओतून केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! या हल्ल्यामुळं विकास लवांडे यांनी केलेले आरोप हे सिद्धच झाले आहेत आणि असे हल्ले हे काही नवीन नाहीत. त्यामुळं या गुंडांच्या हल्ल्याला आम्ही भीक घालणार नाहीत. या हल्ल्यातील सर्व गुंडांच्या सरकारने तत्काळ मुसया आवळाव्यात आणि हा हल्ला करताना लवांडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळं त्यांना तातडीने पोलीस संरक्षणही पुरवावं, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.
विकास लवांडे हे एक लढाई जिंकले – उपनेत्या सुषमा अंधारे
हा विकास लवांडे यांचा विजय आहे. काम, क्रोध, मोह, मत्सर या षडरिपूपासून संत संप्रदायाने खूप लांब राहायचे असते. येथे संत संप्रदायात डुप्लिकेट लोक घुसलेले आहेत. यांना ना संतत्व कळले ना वारकरी संप्रदाय कळला. ज्या अर्थी या लोकांनी विकास लवांडे यांच्यासोबत अशी कृती केली, त्यांचा लांबपर्यंत वारकरी संप्रदायाशी संबंध नसल्याचे समोर आले आहे. विकास लवांडे हे एका अर्थाने एक लढाई जिंकलेले आहेत, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.










