- जाहिरात -spot_img
breaking news

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सदैव प्रेरणादायी : श्रीकांत छिंदम, दिल्लीगेट येथील भव्य देखाव्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन

दिल्लीगेट येथील भव्य देखाव्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या रक्षणासाठी मुघलांशी संघर्ष करून न्याय, स्वाभिमान आणि सुशासन यांवर आधारित स्वराज्याची निर्मिती केले. समाजातील सर्व घटकांचा विचार केला व महिलांचा सन्मान केला. त्यामुळे महाराजांच्या स्वराज्यात सर्व जनाता सुखाने नांदत होती. अशा रयतेचा सांभाळ करत स्वराज्य निर्माण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सदैव प्रेरणादायी आहे. शिवजयंती निमित्त शहरात पहिल्यांदाच भव्य व आकर्षक देखावा साकारून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम दिल्लीगेट येथे होत आहे. शहरातील नागरिक मोठ्या उत्सुकतेने येथील आकर्षक सजावट व देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत, असे प्रतिपादन माजी नगरसेवक श्रीकांत छिंदम यांनी केले.

अहिल्यानगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दिल्ली गेट येथे ‘शिव शंकराचा अवतार तू’ हा भव्यदिव्य देखावा उभारण्यात आला आहे. या आकर्षक व भव्य देखाव्यातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माजी नगरसेवक श्रीकांत छिंदम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या अभिवादन सोहळ्यास प्रतिष्ठानचे पदाधिकारी व मोठ्या संख्यने कार्यकर्ते उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सायंकाळी शालेय पोवाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यास शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे, अशी नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी दिली.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक प्रतिष्ठानचे राजू म्याना, राजू जामदारे, शाहिद शेख, महेश सब्बन, अमोल बोल्ली, विनायक गुडेवार, विजय सामलेटी, नरेंद्र गुरुड, जयंत कारामपुरे, किशोर हरबा, स्वप्निल दिवाने, रोहन येनगुंडूल व सागर बल्लाळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  कांद्याला कवडीमोल भाव; रस्त्यावर उतरत शेतकऱ्यांनी केले अनोखे आंदोलन
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ