- जाहिरात -spot_img
breaking news

दुष्काळमुक्तीसाठी आदर्शगाव योजनेतील कामे पूर्ण करा…कोणी दिल्या सूचना

जलसंधारण विभागाचे सहसचिव देवेंद्र भामरे ; आदर्शगाव हिवरेबाजारला भेट
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

महाराष्ट्रातील आदर्श गाव योजनेच्या अंतर्गत समाविष्ट असलेल्या गावांनी आपल्या भागातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून आदर्श गावांचे महत्त्व पटवून द्यावे, जेणेकरून भविष्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य होईल, असे आवाहन मंत्रालयातील मृद व जलसंधारण विभागाचे अवर सचिव तथा विशेष कार्य अधिकारी देवेंद्र भामरे यांनी यांनी केले.
नुकतीच देवेंद्र भामरे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील ‌‘आदर्श गाव हिवरे बाजार‌’ येथे भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. या भेटीदरम्यान त्यांनी संपूर्ण हिवरे बाजार परिसराची पाहणी करून जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्राच्या कामांचा विस्तृत आढावा घेतला, तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून राज्यातील आदर्श गाव योजनेच्या प्रगतीबाबत पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
माजी मंत्री स्वगय पतंगराव कदम, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि हिवरे बाजारचे मार्गदर्शक डॉ. पोपटराव पवार यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श गावे निर्माण करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत आतापर्यंत 100 हून अधिक गावे आदर्श करण्यात यश आले असून, सध्या 46 गावांमध्ये कामे वेगाने सुरू आहेत. भविष्यातील हवामान बदलांचा आणि ‌’एल निनो‌’चा संदर्भ देत त्यांनी एक महत्त्वाचा इशारा दिला. पुढील चार ते पाच वर्षे कमी पावसाची म्हणजेच दुष्काळसदृश असण्याची शक्यता आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत ज्या गावांमध्ये आदर्श गाव योजनेची कामे अपूर्ण आहेत, ती कामे तातडीने व प्राधान्याने पूर्ण करणे गरजेचे आहेत. हे मॉडेल जितक्या लवकर यशस्वी होईल, तितकाच मोठा हातभार महाराष्ट्राला दुष्काळ आणि टंचाईमुक्त करण्यासाठी लागेल. हिवरे बाजारने जलसंधारण आणि ग्रामविकासात घेतलेली झेप ही इतर गावांना दिशा देणारी असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
मृद व जलसंधारण क्षेत्रातील अग्रणी काम केलेल्या व लोकसहभागातून गावाचा विकास कसा करता येऊ शकतो, याचे देशातील तसेच राज्यातील ‌‘आदर्श‌’ हिवरे बाजार हे उत्तम उदाहरण आहे. गावाने लोकसहभागाच्या जोरावर उभे केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय असून, महाराष्ट्रातील इतर गावांनीही याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध जलसंधारण प्रक्रिया आणि योजना अधिक प्रभावी, सुटसुटीत व सुलभ पद्धतीने कशा पूर्ण करता येतील, यासाठी ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. हिवरे बाजारमधील कामांचा अनुभव आणि तेथील यश पाहून, महाराष्ट्रातील इतर सर्व गट व क्षेत्रांत अशाच प्रकारच्या योजना अधिक सुलभतेने कशा राबवता येतील, यावर शासन स्तरावर विचार केला जाईल, तसेच पुढील नियोजनात याचा नक्कीच मोठा फायदा होईल, असा विश्वास उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
भेट देणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी हिवरे बाजारच्या ग्रामस्थांनी आणि प्रशासनाने एकत्र येऊन केलेल्या या अतुलनीय कामाचे मनापासून कौतुक केले व गावाला पुढील वाटचालीसाठी देवेंद्र भामरे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी हिवरे बाजारच्या सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे, व्हाईस चेअरमन रामभाऊ चत्तर, बाबासाहेब गुंजाळ, एस. टी. पादीर सर, रो. ना. पादीर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  जातेगाव ते राळेगण सिद्धी रस्ता बनला मृत्यूचा सापळा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ